Corona vaccine-सांगलीत कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 17:10 IST2021-01-08T17:09:24+5:302021-01-08T17:10:44+5:30
Corona vaccine Sangli- कोरोना लस मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तसेच आरोग्य विभागातील डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचारी यांना याबाबतचे परिपूर्ण प्रशिक्षण मिळावे यासाठी कोरोना ड्राय रन (रंगीत तालीम) घेण्यात आली. ही मोहिम दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे.

Corona vaccine-सांगलीत कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन यशस्वी
सांगली : कोरोना लस मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तसेच आरोग्य विभागातील डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचारी यांना याबाबतचे परिपूर्ण प्रशिक्षण मिळावे यासाठी कोरोना ड्राय रन (रंगीत तालीम) घेण्यात आली. ही मोहिम दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यातील पहिल्या भागात शासकीय व खाजगी आरोग्य विभागाचे डॉक्टर्स, अधिकारी,
कर्मचारी यांना लस देण्यात येणार आहे. त्यासाठी आज रंगीत तालीम घेतली असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.
मिरज तालुक्यात कवलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात पार पडली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, डुडी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सावंत, कवलापूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शितोळे, डॉ. भूपाल शेळके, मिरज पंचायत उपसभापती पाटील उपस्थित होते.
डुडी म्हणाले, दुसऱ्या भागामध्ये फ्रंटलाईनवर काम करणाऱ्यांना (पोलीस विभाग, महसूल विभाग, इतर शासकीय विभाग, बँक कर्मचारी, आशा वर्कर्स आदि) लसीकरण करण्यात येणार आहे. दोन डोस देण्यात येणार आहेत. पहिला डोसच्या 28 दिवसानंतर दुसरा देण्यात येणार आहे. पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोसची माहिती जिल्हा परिषदेमध्ये कॉल सेंटररून देण्यात येणार आहे.
रंगीत तालीमीमध्ये तीन विभाग करण्यात आले. पहिल्या विभागामध्ये आरोग्य विभागातील 25 कर्मचाऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली. दुसऱ्या विभागामध्ये आधार नोंदणीची सत्यता पडताळणी करून लस देण्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले. तिसऱ्या विभागामध्ये रिकव्हरी रूमची व्यवस्था करण्यात आली. यामध्ये लाभार्थ्याला अर्धा तास थांबवून घेऊन लसीकरणानंतर नियमितपणे कोरोना बाबतचे मार्गदर्शन करण्यात आले.
मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, शारिरीक अंतर पाळणे याबाबतचे महत्व सांगण्यात आले. लसीकरणानंतर काही त्रास होत असेल तर तातडीने उपचारसाठी स्वतंत्र बेडची व्यवस्थाही करण्यात आली होती. लस घेतलेल्यांचे आधार लिकिंग होणार आहे.
इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालयात ड्रायरनचा शुभारंभ प्रतिक जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील, प्रांताधिकारी नागेश पाटील, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय.बी कांबळे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नरसिंह देशमुख यांची उपस्थिती होती.