मिरज रेल्वे स्थानकात मद्यधुंद तिकीट तपासनीसाची सहाय्यक पोलिस फाैजदारास मारहाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2023 22:24 IST2023-02-28T22:23:33+5:302023-02-28T22:24:21+5:30

मद्यपी रेल्वे तिकीट तपासनीसाकडून रेल्वे पोलिसास मारहाणीमुळे खळबळ उडाली होती.

drunken ticket inspector assaulted an assistant police officer at miraj railway station | मिरज रेल्वे स्थानकात मद्यधुंद तिकीट तपासनीसाची सहाय्यक पोलिस फाैजदारास मारहाण 

मिरज रेल्वे स्थानकात मद्यधुंद तिकीट तपासनीसाची सहाय्यक पोलिस फाैजदारास मारहाण 

सदानंद औंधे, मिरज- मिरज रेल्वे स्थानकात मद्यधुंद तिकीट तपासनीसाने रेल्वे पोलिस ठाण्यातील सहाय्यक फाैजदारास मारहाण करून शर्टाची बटने तोडलि. सोमवारी रात्री नऊ वाजता घडलेल्या या घटनेबाबत सहायक पोलीस फौजदार राजाराम पांडुरंग पाटील वय ५६ यांनी मिरज रेल्वे पोलिसात फिर्याद दिली आहे. , टीसी देवेंद्र दिलीप पाटील वय 32 रा. सातारा याच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यांत आला आहे.

मद्यपी रेल्वे तिकीट तपासनीसाकडून रेल्वे पोलिसास मारहाणीमुळे खळबळ उडाली होती. मिरज रेल्वे स्थानकात टीसी म्हणून काम करणारा देवेंद्र पाटील हा सोमवारी रात्री नऊ वाजता मिरज रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक तीनवर ड्युटीवर होता. मात्र मद्यधुंद अवस्थेत तो येण्या - जाणाऱ्या प्रवाशांची तिकीट तपासणी करत होता. यावेळी तेथे साध्या कपड्यांत रेल्वेचे सहाय्यक फाैजदार राजाराम पाटीलही ड्यूटीवर होते. दारूच्या नशेत असणारा देवेंद्र पाटील याने महिला प्रवाशांची छेडछाड केली. त्याने एका महिला प्रवाशाला शिवीगाळ केली.

संबंधित महिला प्रवाशांनी सहाय्यक फौजदार पाटील यांच्याकडे संबंधित तपासणीसाची तक्रार केल्याने असता पाटील यांनी त्यास विचारणा केली. यावेळी देवेंद्र पाटील याने राजाराम पाटील यांच्या अंगावर धावून जात शिवीगाळ व मारहाण केली. झटापटीत राजाराम पाटील यांच्या शर्टाची बटनेही तुटली. या प्रकारानंतर पोलीस फौजदार राजाराम पाटील यांनी मिरज लोहमार्ग पोलिसात फिर्याद दिल्यानंतर तिकीट तपासनीस देवेंद्र पाटील याच्यावर गुन्हा दाखल करुन त्यास अटक करण्यांत आली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: drunken ticket inspector assaulted an assistant police officer at miraj railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली