शहरं
Join us  
Trending Stories
1
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
2
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
3
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
4
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
5
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
6
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
7
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
8
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
9
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
10
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
11
अरे बापरे! Grok वापरणाऱ्यांनो सावधान; लोकांच्या घराचे पत्ते, पर्सनल माहिती लीक, प्रायव्हसी धोक्यात
12
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
13
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
14
GenZमध्ये महाराष्ट्र सरकारची कार्यशैली लोकप्रिय; ६७% तरुणाईला देवेंद्र फडणवीसांवर 'विश्वास'
15
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
16
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
17
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
18
'बिनशर्त माफी मागा, अन्यथा पाच कोटींचा दावा ठोकणार' महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांना नोटीस
19
America Visa : सोशल मीडियावर एक चूक कराल, तर तुमच्यासाठी बंद होतील अमेरिकेचे दरवाजे! काय आहे नियम?
20
Aaditya Thackeray : "साधुग्राम, तपोवन हवा पण भाजपाच्या बिल्डर मित्रांची दादागिरी नाही", आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: चारच महिन्यांपूर्वी लग्न अन् काळाचा घाला; ट्रॅक्टर उलटून तरुण ठार.. मदतीसाठी गेलेल्या रूग्णवाहिकेचाही अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 19:04 IST

दिघंची : वळण घेताना अंदाज न आल्याने ट्रॅक्टर पलटी होऊन चालक जागीच ठार झाल्याची घटना दिघंची (ता. आटपाडी) येथील ...

दिघंची : वळण घेताना अंदाज न आल्याने ट्रॅक्टर पलटी होऊन चालक जागीच ठार झाल्याची घटना दिघंची (ता. आटपाडी) येथील ढोले मळा-मोरे मळा कॅनॉल फाट्याजवळ घडली. ही घटना बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. राजेवाडी येथील गणेश बनपट्टे (वय २३) असे मयत झालेल्या चालकाचे नाव आहे.या अपघातातील जखमीला आणण्यासाठी गेलेल्या रूग्णवाहिकेचा देखील त्याच ठिकाणी वळणाचा अंदाज न आल्याने कॅनॉलमध्ये पडल्याने अपघात झाला. यामध्ये सागर घोडके हे रूग्णवाहिकेचे चालक गंभीर जखमी झाले.याबाबत अधिक माहिती अशी, बुधवार दि. ३ डिसेंबर रोजी दुपारी राजेवाडी मधील युवक गणेश बनपट्टे हा ट्रॅक्टर घेऊन ढोले मळा येथे येत असताना ढोले मळ्याजवळ असणाऱ्या कॅनॉल जवळ ट्रॅक्टर पलटी झाला. यावेळी ट्रॅक्टरच्या खाली गणेश बनपट्टे हा चालक सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

हा अपघात झाल्याचे समजताच दिघंची मधील रूग्णवाहिका बोलवण्यात आली. यावेळी अपघातस्थळी वळणाचा अंदाज न आल्याने रूग्णवाहिका कॅनॉलमध्ये पडून अपघातग्रस्त झाली. यामध्ये सागर घोडके हे चालक गंभीर जखमी झाले.चारच महिन्यांपूर्वी लग्न अन् काळाचा घालाराजेवाडी येथील मयत गणेश बनपट्टे या युवकाचे चारच महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. गणेश बनपट्टे यांचा मृत्यू झाल्याने राजेवाडी गावावर शोककळा पसरली तर त्याच ठिकाणी रूग्णवाहिकेचा देखील दुर्दैवी अपघात झाल्याने सागर घोडके हा युवक गंभीर जखमी झाल्याने लोकांनी हळहळ व्यक्त केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Tractor Accident Kills Newlywed; Ambulance Responding Crashes

Web Summary : A tractor accident near Dighanchi killed 23-year-old Ganesh Banpatte, just four months after his wedding. An ambulance responding to the scene also crashed, seriously injuring the driver, Sagar Ghodke. Tragedy struck twice at the same location.