शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या खुल्या भूखंडांची श्वेतपत्रिका काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:27 IST

सांगली : महापालिका मालकीच्या खुल्या भूखंडांची श्वेतपत्रिका काढून या भूखंडांना नाव लावण्याचे आदेश राज्याच्या नगरविकास विभागाने दिले. याबाबत ...

सांगली : महापालिका मालकीच्या खुल्या भूखंडांची श्वेतपत्रिका काढून या भूखंडांना नाव लावण्याचे आदेश राज्याच्या नगरविकास विभागाने दिले. याबाबत सर्वपक्षीय कृती समितीने नगरविकास विभागाकडे मागणी केली होती. त्याला यश आले आहे.

महापालिकेच्या मालकीचे हजारहून अधिक भूखंड आहेत. शहराच्या विस्तारित व उपनगरांत खुल्या भूखंडांची संख्या अधिक आहे. यातील अनेक भूखंडांवर महापालिकेचे नाव अद्याप लागलेले नाही. जुन्याच मालकाचे नाव असल्याने भूखंडांचा बाजार होत आहे. गेल्या काही महिन्यांत तीन ते चार भूखंडांची विक्री झाल्याचे प्रकरण समोर आले होते. गुंठेवारीतील भूखंडांवर बेकायदेशीर कब्जा करण्यात आला आहे. मंजूर रेखांकनातील भूखंडांची खुलेआम विक्री सुरू आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी सर्वपक्षीय कृती समितीने पुढाकार घेतला आहे. याबाबत समितीच्यावतीने आयुक्तांनाही निवेदन देण्यात आले होते. खुल्या भूखंडाला नाव लावण्यासाठी महापालिकेने मानधनावर तहसील दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे.

सर्वपक्षीय कृती समितीने खुल्या भूखंडांबाबत नगरविकास विभागाशीही पत्रव्यवहार केला होता. महापालिकेने खुल्या भूखंडांची श्वेतपत्रिका काढून त्यावर नाव लावण्यासाठी तातडीने प्रक्रिया सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. नगरविकास विभागाचे अवर सचिव किशोर गोखले यांनी यासंदर्भात महापालिका प्रशासनाला पत्र पाठवून श्वेतपत्रिका काढण्याचे आदेश दिले आहेत.

चौकट

टीडीआरबाबत निर्देश

खुले भूखंड ताब्यात घेण्यासाठी महापालिकेला मोठी आर्थिक तरतूद करावी लागणार आहे. सध्याची भूखंडाच्या मोबादल्यात नुकसानभरपाई देण्याची महापालिकेची स्थिती नाही. त्यासाठी टीडीआर हा पर्याय आहे. त्याबाबतही नगरविकास विभागाने महापालिकेला निर्देश दिले असल्याचे समितीचे सतीश साखळकर यांनी सांगितले.