शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

बेळंकीत श्रीराम बझारवर दरोडा सहा लाखाचा माल लंपास : दहा ते बारा जणांच्या टोळीचे कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 9:23 PM

सलगरे : बेळंकी (ता. मिरज) येथील विकास गव्हाणे यांच्या मालकीच्या श्रीराम बझार या मॉलवर दहा ते बारा जणांच्या टोळीने शुक्रवारी मध्यरात्री दोन ते तीनच्या सुमारास दरोडा टाकला.

ठळक मुद्दे मोबाईल, कपडे, भांडी लांबवली

सलगरे : बेळंकी (ता. मिरज) येथील विकास गव्हाणे यांच्या मालकीच्या श्रीराम बझार या मॉलवर दहा ते बारा जणांच्या टोळीने शुक्रवारी मध्यरात्री दोन ते तीनच्या सुमारास दरोडा टाकला. चोरट्यांनी मॉलमधील मोबाईल, भांडी, कपडे यासह सुमारे सहा लाखांचा माल लंपास केला. मॉलमधील सीसीटीव्हीत चोरट्यांच्या हालचाली कैद झाल्या आहेत. मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली व श्वानपथकाद्वारे चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न झाला.

बेळंकी येथे विकास गव्हाणे यांच्या मालकीचा श्रीराम बझार आहे. गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास त्यांनी मॉल बंद केला. मध्यरात्री दोनच्या सुमारास चारपैकी दुसऱ्या क्रमांकाचे शटरचे कुलूप व कडी कापून चोरट्यांनी मॉलमध्ये प्रवेश केला. सीसीटीव्हीमध्ये मिळालेल्या फुटेजनुसार किमान प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये दोघे आणि बाहेर दोघे असे दहा ते बारा जण बॅटरी वापरून चोरी करीत असल्याचे मिळून आले आहे. चोरट्यांनी मॉलमधील १२५ मोबाईल, कपडे, पितळी भांडी आणि काही भांड्यांचे सेट असे सुमारे सहा लाख रुपयांचे साहित्य मोठ्या वाहनाच्या मदतीने लंपास केले. समोरील एक सीसीटीव्ही खाली वाकवून त्याचे फुटेज उपलब्ध होऊ दिले नाही. काही जणांनी तोंडाला कापड बांधले असल्याचे फुटेजमध्ये दिसल्याचे गव्हाणे यांनी सांगितले.

शुक्रवारी सकाळी मॉल फोडल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलीसपाटील चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. मिरज ग्रामीणचे पोलीस निरीक्षक जाधव आणि तळपे यांनी भेट दिली व पंचनामा केला. सांगली येथील श्वानपथकाद्वारे चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. परंतु मॉलच्या आजुबाजूलाच श्वान घुटमळले. बेळंकी येथील ही दुसरी मोठी घटना आहे. दोनच दिवसांपूर्वी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला होता. या घटनेने बेळंकी परिसरात आणि मिरज पूर्व भागात खळबळ उडाली आहे.जनरल स्टोअर्स फोडलेश्रीराम बझारच्या शेजारीच राहुल गव्हाणे यांच्या मालकीचे शिवकृपा जनरल स्टोअर्स आहे. या दुकानाचे कुलूप व कडी तोडून आतील गॉगल, पट्टे, चार हजार रुपये असे साहित्य लंपास केले. सुदैवाने इतर साहित्याची चोरी अथवा मोडतोड केली नाही. या दोन्ही घटनास्थळी भेट देऊन ठसेतज्ज्ञांनी ठशांचे नमुने घेतले आहेत.स्टायलिश चोरटेचोरट्यांनी पायात बूट, जीन पॅन्ट आणि जर्किन असा पेहराव केला होता. कपडे चोरताना स्वत:च्या मापाचेच कपडे घेतले. मॉलमधील माल तेथीलच पोती वापरून भरून दुकानाबाहेर आणल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे. 

 

टॅग्स :SangliसांगलीPoliceपोलिस