शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
8
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
9
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
10
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
11
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
12
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
13
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
14
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
15
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
16
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
17
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
18
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
19
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
20
खून करुन आलोय, मुलींकडे लक्ष द्या; पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून केले वार, कोल्हापुरात हत्येचा थरार

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती विशेष: शाहू महाराजांनी विरोध डावलून लावला प्रेमविवाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 17:11 IST

Chhatrapati Rajarshi Shahu Maharaj Jayanti 2025: मिरजेशी होते जिव्हाळ्याचे संबध

प्रसाद माळीसांगली : प्रेयसीसोबत पळून जाऊन लग्न करायचे असते, तेव्हा आठवतो जिवलग मित्र; पण तो जिवलग मित्र राजा असेल तर.. असेच काहीसे मिरजेच्या मिशनरी रुग्णालयातील डॉ. विलियम वाॅनलेस यांच्याबाबतीत घडले होते. डॉ. वाॅनलेस यांचा विवाह छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी मिशनरी विरोध डावलून लावला आणि मैत्रीचे एक अनोखे उदाहरण जगासमोर ठेवले होते.मिरजेच्या मिशनरी दवाखान्यात रुग्णसेवा बजावणारे डॉ. विलियम वाॅनलेस आणि कोल्हापूरचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे दोघे घनिष्ट मित्र होते. डॉ. वॉनलेस शाहू महाराजांचे फॅमिली डॉक्टरसुद्धा होते. १९०६ साली कॉलराने डॉक्टरांची पत्नी मेरी वाॅनलेस यांचा मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूने डॉ. वॉनलेस अत्यंत व्यथित झाले होते. मेरी यांच्या निधनाने खचून डॉ. वॉनलेस गंभीर आजारी पडले. मेरी वॉनलेस यासुद्धा परिचारिका होत्या. त्यांच्या निधनाने मिरजेतील दवाखान्यात परिचारिकेची जागा रिकामी झाली होती. त्यामुळे कोल्हापूरच्या मिशनरीने तेथील परिचारिका लिलियन हेवन्स यांना मिरजेत पाठवले. लिलियन हेवन्स यांनी अन्य रुग्णांसोबत डॉ. वॉनलेस यांचीही अत्यंत काळजीने सुश्रुषा केली. लिलियन यांच्या सेवेने डॉक्टर बरे झाले व पुन्हा त्यांनी रुग्णसेवेत स्वत:ला व्यस्त केले. सोबत काम करत असताना डॉ. विलियम वॉनलेस आणि लिलियन हेवन्स यांचे एकमेकांवर प्रेम जडले.

लिलियन या अमेरिकेत असताना त्यांचे लग्न झाले होते; पण काही दिवसांत त्यांच्या पतीचे निधन झाले होते. त्यामुळे त्या भारतात आल्या होत्या. दोघेही तसे समदु:खी होते. आता एकमेकांच्या साथीने त्यांना पुन्हा संसार सुरू करायचा होता; पण तत्कालीन मिशनरीचा विधवा-विधुरांच्या पुनर्विवाहास विरोध होता. यामुळे दोघेही प्रेमीयुगुल व्यथित झाले होते. हा प्रकार छत्रपती शाहू महाराजांपर्यंत पोहोचला. मिशनरीच्या विरोधामुळे शाहू महाराजही चिंतित होते. एकेदिवशी शाहू महाराज सजवलेला रथ घेऊन मिरजेत पोहोचले. त्यांनी डॉ. विलियम वॉनलेस आणि लिलियन हेवन्स यांना रथात बसवले. मिरजेहून दौडवलेला रथ शाहू महाराजानी थेट पन्हाळ्याच्या पायथ्याशी असणाऱ्या त्यांच्या संस्थानातील कोडोली येथील चर्चजवळ थांबवला. शाहू महाराजांच्या आदेशानुसार तेथील कोडोली मिशनरीचे प्रमुख डॉ. ग्रॅहम यांनी चर्चमध्ये डॉ. वॉनलेस आणि लिलियन यांचा ख्रिस्ती पद्धतीने विवाह लावला. स्वत: महाराजांनीच हा विवाह घडवून आणल्याने मिशनरीनेही या लग्नास मान्यता दिली. असा एक अनोखा विवाह राजर्षी शाहू महारांजानी आपले मित्र डॉ. विलियम वॉनलेस यांचा विवाह लावला हाेता.

मिरजेच्या मेडिकल हबची पायाभरणीही मैत्री इथेच थांबली नाही. मिरज मिशनच्या रुग्णालयासाठी शाहू महाराजांनी अनेक देणग्या दिल्या. आज मिरज मेडिकल हब बनले आहे. त्याचा पाया मिरज मिशन हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉ. वाॅनलेस यांनी घातला होता. हे कार्य करत असताना डॉ. वाॅनलेस यांच्या पाठीशी शाहू महाराज सदैव खंबीरपणे उभे राहिले. या मैत्रीच्या जोडगोळीमुळेच मिरजेत आजचे मेडिकल विश्व उभे राहिले आहे.

टॅग्स :Shahu Maharaj Jayantiशाहू महाराज जयंतीSangliसांगलीmiraj-acमिरजdoctorडॉक्टरmarriageलग्न