डॉ. मधु पाटील यांचे निधन

By विश्वास पाटील | Updated: August 13, 2022 00:29 IST2022-08-13T00:27:39+5:302022-08-13T00:29:09+5:30

Dr. Madhu Patil : माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्या भगिनी मधु प्रकाश पाटील (वय ४४) यांचे आज शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.

Dr. Madhu Patil passed away | डॉ. मधु पाटील यांचे निधन

डॉ. मधु पाटील यांचे निधन

सांगली - माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्या भगिनी मधु प्रकाश पाटील (वय ४४) यांचे आज शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या शनिवारी दुपारी एक वाजता पद्माळे येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. 
काँग्रेसचे खासदार स्व. प्रकाशबापू पाटील आणि काँग्रेसच्या नेत्या श्रीमती शैलजा पाटील यांच्या त्या कन्या होत्या. रात्री आठच्या सुमारास पुणे येथे त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. त्यांना उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. मात्र त्यांचे उपचार सुरू असताना निधन झाले. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची त्या नात होत्या.

Web Title: Dr. Madhu Patil passed away

टॅग्स :Sangliसांगली