घरेलू कामगारांनी नोंदणी करण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:18 IST2021-07-01T04:18:33+5:302021-07-01T04:18:33+5:30
सांगली : महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंद असलेल्या कामगारांना दीड हजार रुपये मदतीची घोषणा शासनाने केली आहे. ...

घरेलू कामगारांनी नोंदणी करण्याचे आवाहन
सांगली : महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंद असलेल्या कामगारांना दीड हजार रुपये मदतीची घोषणा शासनाने केली आहे. बऱ्याच घरेलू कामगारांनी नोंदणी करतेवेळी त्यांचे बँक पासबुक व आधार कार्डची झेरॉक्स दिलेली नाही. तरी त्यांनी आपली वैयक्तिक माहिती अद्ययावत करावी, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी केले आहे. माहिती अद्ययावत केल्यानंतर मदत मिळणे सोयीचे होणार असल्याचेही गुरव यांनी सांगितले.
-----
कवठेपिरानमधून ट्रॅक्टर लंपास
सांगली : कवठेपिरान (ता.मिरज) येथून दीड लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर लंपास करण्यात आला. याप्रकरणी आप्पासाहेब जिन्नाप्पा पाटील (रा. गर्ल हायस्कूलजवळ,कवठेपिरान) यांनी ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे. रविवार दि. २७ जूनला हा प्रकार घडला. ट्रॅक्टरसह ट्रॉलीही चाेरट्यांनी लंपास केली.
------
लक्ष्मी मंदिर चौकात अपघातात महिला जखमी
सांगली : शहरातील लक्ष्मी मंदिर चौकात मोटारीने दुचाकीला दिलेल्या धडकेत महिला जखमी झाली. याप्रकरणी कमल रघुनाथ चव्हाण (रा. राम मंदिर चौक) यांनी पीयूष पप्पू भंडारे (रा. यशवंतनगर,सांगली) याच्याविरोधात फिर्याद दिली आहे. मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास हा अपघात घडला.
------