शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

ताकारी योजनेची कामे शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन करा, आमदार विश्वजीत कदम यांनी केली सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 16:56 IST

कडेगाव : ताकारी योजनेंतर्गत बंदिस्त पाईपलाईनच्या कामांबाबत लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शंका आणि तक्रारी आहेत. या शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना विश्वासात ...

कडेगाव : ताकारी योजनेंतर्गत बंदिस्त पाईपलाईनच्या कामांबाबत लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शंका आणि तक्रारी आहेत. या शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना विश्वासात घेऊन योजनेची कामे करावी, अशी सूचना आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात औचित्याच्या मुद्याद्वारे केली.विश्वजीत कदम म्हणाले, ताकारी योजना ही दुष्काळी भागांसाठी वरदायिनी ठरली आहे. परंतु, या योजनेंतर्गत सुरू असलेल्या बंदिस्त पाईपलाईनच्या कामांविषयी शेतकऱ्यांमध्ये तक्रार व शंका आहे. अनेक शेतकऱ्यांचा असा विश्वास आहे की, बंदिस्त पाईपलाईनमुळे पाण्याचा पाझर कमी होईल आणि विहिरींच्या पाणी पातळीवर प्रतिकूल परिणाम होईल. ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रातील देवराष्ट्रे, मोहित्यांचे वडगाव, वांगी, अंबक या गावांतील ग्रामपंचायत पदाधिकारी, पाणीवापर संस्थांचे पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी बंदिस्त पाईपलाईन योजनेच्या कार्यान्वयाविषयी तक्रारी केल्या आहेत. काही शेतकऱ्यांचा या पाईपलाईन कामांना विरोध आहे, तर काहींच्या मनात शंका आहेत. प्रशासनाने शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या शंकांचे निरसन करणे महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांचा विरोध दूर करण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधून, त्यांना योजना कशी फायदेशीर आहे, हे पटवून देणे गरजेचे आहे.शेतकऱ्यांचे सहकार्य महत्त्वपूर्णबंदिस्त पाईपलाईनच्या कामामध्ये शेतकऱ्यांचा सहभाग आणि त्यांचा विश्वास खूप महत्त्वाचा आहे. कारण याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी शेतकऱ्यांचे सहकार्य महत्त्वपूर्ण आहे. यामुळे बंदिस्त पाईपलाईनबाबत शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणतीही पुढील कार्यवाही होऊ नये, असे आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनWaterपाणीFarmerशेतकरी