प्रभागनिहाय आरक्षण : इच्छुकांचा अपेक्षाभंग

By Admin | Updated: January 29, 2015 00:06 IST2015-01-28T23:01:48+5:302015-01-29T00:06:18+5:30

मालगाव ग्रामपंचायत निवडणूक : सोडतीसाठी बैठक

Division wise reservation: Desperate desire | प्रभागनिहाय आरक्षण : इच्छुकांचा अपेक्षाभंग

प्रभागनिहाय आरक्षण : इच्छुकांचा अपेक्षाभंग

मालगाव : मालगाव (ता. मिरज) येथील ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले. नव्याने जाहीर केलेल्या आरक्षणामुळे निवडणूक लढविण्यास इच्छुक असणाऱ्यांचा अपेक्षाभंग झाला, तर विद्यमान एका सदस्याचा अपवाद वगळता सरपंचासह इतर सदस्यांना या आरक्षणाने तारले आहे
मालगाव येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. २०१५ ते २०२० या कालावधीसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत कार्यालयात आरक्षण सोडतीसाठी बैठक पार पडली. तलाठी एस. डी. हंगे, सरपंच प्रदीप सावंत, जि. प. सदस्य आप्पासाहेब हुळ्ळे, काकासाहेब धामणे यांच्या उपस्थितीत लहान मुलीच्याहस्ते चिठ्ठी काढून प्रभागनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले.
जाहीर केलेले आरक्षण असे : प्रभाग क्र. १ - अनुसूचित जाती महिला वर्ग, सर्वसाधारण महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला. प्रभाग क्र. २ - अनुसूचित जातीमधील महिला, सर्वसाधारण वर्गासाठी खुला. प्रभाग क्र. ३ - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सर्वसाधारण वर्गासाठी खुला. प्रभाग क्र. ४ - नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी खुला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण वर्गासाठी खुला. प्रभाग क्र. ५ - अनुसूचित जातीमधील पुरुष, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सर्वसाधारण वर्गासाठी खुला. प्रभाग क्र. ६ - सर्वसाधारण महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सर्वसाधारण वर्गासाठी खुला.
आगामी निवडणुकीसाठी ५० टक्के महिलांना निवडणुकीची संधी मिळणार असल्याने ग्रामपंचायतीमध्ये १७ सदस्यांमध्ये ९ महिला व आठ पुरुष अशी सदस्यसंख्या असणार आहे. महिलांच्या पन्नास टक्के आरक्षणामुळे प्रभाग क्र. २ मध्ये अनुसूचित जातीमधील महिला वर्गासाठी आरक्षण पडल्याने विद्यमान सदस्य विश्वास खांडेकर यांना त्याचा फटका बसला आहे. त्यांच्यापुढे सर्वसाधारण खुल्या वर्गातून निवडणूक लढविण्याचा पर्याय आहे. खांडेकर यांचा अपवाद वगळता सरपंच प्रदीप सावंत, काकासाहेब धामणे यांच्यासह इतर सदस्यांना या आरक्षणाने तारले आहे. जाहीर होणाऱ्या आरक्षण सोडतीसाठी आगामी निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्यांनी ग्रामपंचायतीमध्ये गर्दी केली होती. मात्र इच्छुकांच्या प्रभागात आरक्षण पडल्याने अनेकांचा अपेक्षाभंग झाला. (वार्ताहर)

Web Title: Division wise reservation: Desperate desire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.