शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: विधानसभेच्या उमेदवारीवरुन जत तालुका भाजपात अस्वस्थता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 17:58 IST

विठ्ठल ऐनापुरे जत : भाजपाकडून जत विधानसभेसाठी पाच-सहा उमेदवार इच्छुक आहेत. त्यामुळे उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे. आता उमेदवारी मिळविण्यात ...

विठ्ठल ऐनापुरेजत : भाजपाकडून जत विधानसभेसाठी पाच-सहा उमेदवार इच्छुक आहेत. त्यामुळे उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे. आता उमेदवारी मिळविण्यात काेण बाजी मारणार, अशा चर्चा रंगत असताना विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर देखील जत मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास तयारीत असल्याने जत तालुक्यातील भाजपात अस्वस्थता निर्माण झाली आहे.जत विधासभेसाठी भाजपाकडून माजी आमदार विलासराव जगताप, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, तम्मनगौडा रवी-पाटील, डॉ. रवींद्र आरळी आदी इच्छुक आहेत. विधानसभेसाठी प्रकाश जमदाडे व तम्मनगौडा रवी यांचे काम जोमात सुरू आहे. दोघेही उमेदवार आपापल्या परीने जनतेच्या कामांसंदर्भात जत तालुक्याचा दौरा करीत आहेत. रवी-पाटील यांनी तीन टप्प्यात जनकल्याण पदयात्रा काढली.जमदाडेही जिल्हा बँकेच्या माध्यमातून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावत आहेत. त्यामुळे या दोघांपैकी कोण उमेदवारी पटकावतो, याबाबत उत्सुकता आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनीही जतच्या उमेदवारीसाठी ताकद लावली आहे. यामुळे इच्छुक उमेदवारांसह स्थानिक नेतेमंडळींमध्ये अस्थस्थता आहे.

जत विधानसभेसाठी पडळकरांच्या उमेदवारीस अप्रत्यक्ष विरोध करण्यात येत आहे. जत तालुक्यातील प्रश्नांची जाण असलेला स्थानिक उमेदवारच भाजपने द्यावा, केवळ आमदारकीसाठी लुडबूड करणाऱ्यांना पक्षाचे कार्यकर्ते सहकार्य करणार नाहीत, अशी भूमिका भाजप व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची आहे.लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. विधानसभा निवडणूक नजरेसमोर ठेवून गाेपीचंद पडळकर यांनी १ जूनपासून जत तालुक्याचा दौरा केला. दुसरीकडे माजी आमदार विलासराव जगताप यांनीही पडळकर यांच्या उमेदवारीविराेधात आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘वरून लादलेले नेतृत्व जनता स्वीकारणार नाही, उपरा उमेदवारही जतची स्वाभिमानी जनता सहन करणार नाही’, असा इशारा ते प्रत्येक सभेत देत आहेत.

लाेकसभेला संजय पाटील यांना विरोध करीत जगताप यांनी विशाल पाटील यांचा प्रचार केला. ते निवडूनही आले. आता जत विधानसभा निवडणूक जगताप हे स्वत: लढविणार की जत तालुक्यातील स्थानिक उमेदवारास पाठिंबा देणार?, याबाबतही चर्चेचे फड रंगत आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीjat-acजाटPoliticsराजकारणBJPभाजपाvidhan sabhaविधानसभाGopichand Padalkarगोपीचंद पडळकर