शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगलीतर्फे घरोघरी विधी सेवा माहिती अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 11:15 AM

संपूर्ण सांगली जिल्ह्यात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगली आणि सर्व तालुका विधी सेवा समिती मार्फत दिनांक 9 ते 23 नोव्हेंबर 2019 या कालावधीत घरोघरी जाऊन राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे.

ठळक मुद्देजिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे घरोघरी विधी सेवा माहितीसांगलीत अभियानाची सुरूवात

सांगली : संपूर्ण सांगली जिल्ह्यात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगली आणि सर्व तालुका विधी सेवा समिती मार्फत दिनांक 9 ते 23 नोव्हेंबर 2019 या कालावधीत घरोघरी जाऊन राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे.

या अभियानाची सुरूवात राष्ट्रीय विधी सेवा दिनी दिनांक 9 नोव्हेंबर रोजी वन प्रबोधिनी, कुंडल येथे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली विजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व हस्ते झाली. पाटील यांनी विधी सेवा माहिती अभियानाची माहिती घरोघरी जाऊन देवून गरजु लोकांना त्यांचे अधिकार विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून मिळवून द्यावेत, असे आवाहन केले. या कार्यक्रमात जिल्हा न्यायाधीश ए. एन. पाटील, सातवलेकर, जगताप, पेरमपल्ली, दिवाणी न्यायाधीश केस्तीकर, इंदलकर, रुद्रभाटे यांनी विविध कायद्यांची माहिती दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली चे सचिव विश्वास माने यांनी केले. आभार न्यायाधीश पलुस सुर्यवंशी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हा वन अधिकारी भोसले, श्रीमती कट्टे व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे नागणे, मोरे आणि माळी यांनी सहकार्य केले.

 

टॅग्स :Courtन्यायालयSangliसांगली