शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

भाजप, शिवसेना तपाशी; महाआघाडी उपाशी, सांगलीत निधी वाटपावरुन विरोधी गटाच्या आमदारांमध्ये नाराजी

By अशोक डोंबाळे | Updated: December 27, 2023 16:17 IST

अशोक डोंबाळे सांगली : जिल्हा नियोजनच्या १०० कोटी रुपयांच्या निधी वाटपामध्ये पालकमंत्री २० टक्के, भाजप, शिवसेना (शिंदे गट)ला प्रत्येकी ...

अशोक डोंबाळेसांगली : जिल्हा नियोजनच्या १०० कोटी रुपयांच्या निधी वाटपामध्ये पालकमंत्री २० टक्के, भाजप, शिवसेना (शिंदे गट)ला प्रत्येकी ३० टक्के आणि महाविकास आघाडीच्या आमदारांना २० टक्के निधीचे वाटप केले आहे. या निधी वाटपामध्ये शिवसेना, भाजपची सरशी असून महाविकास आघाडीच्या आमदारांना डावलले आहे. यावरून विरोधी गटाच्या आमदारांमध्ये नाराजीचा सूर आहे.जिल्हा नियोजनच्या १०० कोटी रुपयांच्या निधी वाटपाचे नियोजन पालकमंत्री सुरेश खाडे यांनी केले आहे. या निधीचे वाटप जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये आमदारांच्या सहमतीनेच होते. सत्तेत असणारे आमदार आणि पालकमंत्री जिल्हा नियोजनच्या निधीवर सर्वाधिक हक्क सांगतात. त्यानुसार खाडे यांनी जिल्ह्यात जनसुविधांवर ३२ कोटी ५६ लाख, तीर्थक्षेत्र विकास योजनेसाठी सात कोटी ६३ लाख, ग्रामीण रस्त्यांसाठी २९ कोटी ३२ लाख, जिल्हा मार्ग रस्त्यांसाठी ३० कोटी ४९ लाख रुपयांची कामे करण्याचे नियोजन केले आहे. या निधीचे आमदारांना वाटप करताना पालकमंत्री यांच्यासाठी २० टक्के निधी म्हणजे १३ कोटी २१ लाख रुपये घेतले आहेत. भाजप खासदार, आमदारांसाठी ३० टक्के निधी म्हणजे १९ कोटी ८१ लाख रुपये दिले आहेत. यामध्ये आमदार म्हणून सुरेश खाडे यांना पुन्हा चार कोटी ९५ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. खासदार आणि उर्वरित भाजपच्या दोन आमदारांना निधीचे वाटप केले आहे. शिवसेना (शिंदे गट)चे खानापूरचे एकमेव आमदार अनिल बाबर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांना ३० टक्के म्हणजे १९ कोटी ८१ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. 

महाविकास आघाडीचे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक, सुमनताई पाटील, अरुण लाड, प्रा. जयंत आसगावकर, डॉ. विश्वजित कदम, विक्रमसिंह सावंत असे सात आमदार आहेत. या आमदारांना जिल्हा नियोजनमधून २० टक्के म्हणजे १३ कोटी २१ लाख रुपयांचा निधी दिला आहे. जिल्हा नियोजनच्या निधी वाटपात मोठी विषमता निर्माण झाल्यामुळे महाविकास आघाडीच्या आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

असे झाले निधीचे वाटपपालकमंत्री -  १३.२१ कोटीखासदार संजय पाटील - ५.९४ कोटीआमदार सुरेश खाडे - ४.९५ कोटीआमदार सुधीर गाडगीळ - ४.९५ कोटीआमदार गोपीचंद पडळकर - ३.९६ कोटीखासदार धैर्यशील माने - ९.९० कोटीआमदार अनिल बाबर - ९.९० कोटीआमदार जयंत पाटील - २.११ कोटीआमदार विश्वजित कदम - २.११ कोटीआमदार मानसिंगराव नाईक - २.११ कोटीआमदार विक्रमसिंह सावंत - २.११ कोटीआमदार सुमनताई पाटील - २.११ कोटीआमदार अरुण लाड - १.७२ कोटीआमदार प्रा. जयंत आसगावकर - ९२ लाख

असा होणार निधी खर्चजनसुविधा ३२.५६ कोटीतीर्थक्षेत्र विकास ७.६३ कोटीग्रामीण रस्ते २९.३२ कोटीजिल्हा मार्ग रस्ते ३०.४९ कोटी

टॅग्स :SangliसांगलीPlanning Commissionनियोजन आयोगBJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस