शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिमंडळात सांगलीची झोळी रिकामीच; खाडे, गाडगीळ यांची संधी हुकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 12:27 IST

अपेक्षेने मोठ्या संख्येने नागपूरला गेलेल्या कार्यकर्त्यांना गुलाल उधळण्याची संधीच मिळाली नाही

सांगली : मुख्यमंत्रिपदापासून गृहमंत्रिपदापर्यंतची सर्वोच्च पदे भूषवून कधीकाळी राज्याला दिशा देणाऱ्या सांगली जिल्ह्याची झोळी रिकामीच राहिली आहे. मंत्रिमंडळामध्ये जिल्ह्याला स्थान मिळाले नसून सांगलीकरांच्या पदरी निराशाच पडली आहे.जिल्ह्यातील आठपैकी पाच जागांवर महायुतीच्या उमेदवारांना सांगलीच्या मतदारांनी निवडून दिले. मिरजेतून सुरेश खाडे यांना तब्बल चौथ्यांदा, तर सांगलीतून सुधीर गाडगीळ यांना तिसऱ्यांदा विधानसभेत पाठविले. या दोघांची मंत्रिपदे निश्चित मानली जात होती. त्याशिवाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निष्ठावान मानले जाणाऱ्या दिवंगत अनिल बाबर यांचे चिरंजीव सुहास बाबर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी एकनिष्ठ असणारे जतचे गोपीचंद पडळकर यांच्याही गळ्यात मंत्रिपदाची माळ पडण्याची अपेक्षा होती. यातील खाडे यांनी यापूर्वी एकदा राज्यमंत्री, तर एकदा कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले आहे. त्यामुळे त्यांना मंत्रिपद हमखास निश्चित मानले जात होते. शिवाय त्यांना एखादे वजनदार मंत्रिपद मिळेल, अशीही अपेक्षा होती. त्यांच्या कार्यकर्त्यांचे कान मुंबईहून येणाऱ्या फोनकडे लागले होते. पण, या सर्वांचीच निराशा झाली. गाडगीळ यांनाही कॅबिनेेट मंत्रिपदाची कार्यकर्त्यांची अपेक्षा होती.

रविवारी शपथ घेतलेल्या २९ मंत्र्यांमध्ये सांगलीचा एकही मंत्री नसल्याने सर्वांचीच निराशा झाली. किंबहुना आता पालकमंत्रिपदही अन्य जिल्ह्यातील मंत्र्याकडे जाणार आहे.सांगलीतून कधीकाळी डॉ. पतंगराव कदम, जयंत पाटील, आर. आर. पाटील असे दिग्गज नेते मंत्रिपदी असायचे. त्याचा मोठा फायदा जिल्ह्याला झाला. सिंचन योजनांची कामे वेगाने पुढे सरकली. पण, आता या कामांना कोणाची ताकद लागणार? हा प्रश्न आहे. आपल्या नेत्याला मंत्रिपद मिळेल, या अपेक्षेने मोठ्या संख्येने कार्यकर्ते सांगलीतून नागपूरला गेले आहेत. त्यांना गुलाल उधळण्याची संधीच मिळाली नाही. खाडे आणि गाडगीळ या दोहोंचे अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी स्नेहाचे संबंध आहेत. मात्र, मंत्रिपद मिळण्यासाठी त्याचा उपयोग झाला नसल्याचे रविवारी स्पष्ट झाले.

टॅग्स :SangliसांगलीCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना