शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीच्या दिव्यांग काजलने नागफणी सुळक्यावरून दिली बाबासाहेबांना मानवंदना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 18:09 IST

सांगली : सह्याद्री खोऱ्यात चढाईसाठी कठीण गणला जाणारा लोणावळा येथील ३०० फुटी नागफणी सुळका सांगलीच्या दिव्यांग काजल कांबळे या ...

सांगली : सह्याद्री खोऱ्यात चढाईसाठी कठीण गणला जाणारा लोणावळा येथील ३०० फुटी नागफणी सुळका सांगलीच्या दिव्यांग काजल कांबळे या गिर्यारोहकाने सर केला. हे यश तिने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित केले.मोहिमेची सुरुवात पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याजवळील कुरवंडे (ता.मावळ) गावापासून केली. तेथून एक-दीड तासांच्या पायपिटीनंतर नागफणी सुळक्याच्या माथ्यावर पोहोचली. ३०० फुटी सरळसोट कठीण रॅपलिंग, अंगावर येणारा ओव्हरहँगचा अवघड टप्पा, पाहताक्षणी मनात धडकी भरवणारे सुळक्याचे रूप, हृदयात धडकी भरवणारा ६०० फूट ट्रॅव्हर्स याचा साहस अनुभवणे हा या ट्रेकचा महत्त्वाचा भाग होता. एप्रिल महिन्यातील तीव्र उष्णतेला सामोरे काजलने सुळका पायाखाली घेतला. तिच्या पथकामध्ये चेतन शिंदे, राजश्री चौधरी, विनोद महाले, अभय पाटील, संजय सूर्या आदी २५ गिर्यारोहकांचा समावेश होता. काजलने यापूर्वीही वजीर सुळका, हिरकणी कडा, मोरोशीचा भैरवगड, डांग्या सुळका, संडे वन सुळका, मलंग गड, लिंगाणा सुळका, भैरवकडासारखे असे कठीण सुळके सर केले आहेत. हे सुळके सर करणारी काजल ही महाराष्ट्रातील पहिलीच दिव्यांग मुलगी आहे.

टॅग्स :SangliसांगलीDr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीPuneपुणे