मिरज : मिरजेत ब्राह्मणपुरीत अनम या लेडीज टेलरिंग व फ़ॅशन डिझाईन दुकानांत पाकिस्तानी फँशनचे लेडीज ड्रेस विक्री करण्यात येत होते. याची माहिती मिळताच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी दुकानांच्या बाहेर पाकिस्तानी कुडते, ड्रेस असे लिहलेला डिजिटल फलक फाडला. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख विनायक माईंनकर यांच्यासह कार्यकर्ते याठिकाणी गेल्यावर दुकान बंद असल्याचे निदर्शनास आले. यावेळी शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी दुकानांच्या बाहेर असलेला पाकिस्तानी फॅशनचा उल्लेख असलेला डिजिटल फलक फाडला. काश्मीर खोऱ्यात दहशतवादी हल्ल्याच्या निषेध म्हणून श्री शिवप्रतिष्ठानतर्फे मिरज शहरात पाकिस्तानी फॅशनचे कपडे विकणाऱ्या दुकानावर कारवाईचा इशारा देण्यात आला. अनेक ठिकाणी असे साहित्य विक्री करण्यात येत असून दुकानदारांनी पाकिस्तानी ड्रेस मटेरियल विक्री बंद करावी अन्यथा दुकानात घुसून ड्रेस फाडण्याचा इशारा विनायक माईंणकर यांनी दिला.
Sangli: मिरजेत पाकिस्तानी शब्द लिहिलेले डिजिटल फाडले, शिवप्रतिष्ठानचा इशारा; म्हणाले..
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 19:35 IST