शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Sangli ZP: भाजपला पाठिंबा देण्यावरून राष्ट्रवादीत मतभेद, मुंबईतील बैठकीला नेत्यांची दांडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 12:21 IST

गटनेता नोंदणीचे पत्र प्रशासनाने नाकारले

सांगली : जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) पाठिंब्याच्या निर्णयावर चर्चेसाठी पक्षाच्या वरिष्ठांनी शुक्रवारी मुंबईत बैठक बोलवली होती. मात्र, पक्षाचे जिल्हाध्यक्ष वगळता अन्य नेते गेलेच नाहीत. त्यामुळे पक्षनेतृत्व आणि स्थानिक नेत्यांमधील धुसफुस स्पष्ट झाली आहे. दरम्यान, गटनेता म्हणून राजेश्वरी नाईक यांच्या नावावर शुक्रवारीही प्रशासकीय शिक्कामोर्तब होऊ शकली नाही.आठवडाभरापूर्वी झालेल्या पक्ष बैठकीत सदस्या राजेश्वरी रणधीर नाईक यांची गटनेता म्हणून निवड करण्यात आली. त्याचे पत्र देण्यासाठी पक्षनेते दोन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयात जात आहेत. मात्र, प्रशासनाने तांत्रिक त्रुटी सांगत पत्र स्वीकारले नसल्याचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी सांगितले. शुक्रवारी नेेतेमंडळी पत्र देण्यासाठी उशिरापर्यंत थांबून होती. मात्र, त्यांना परत फिरावे लागले. आता शनिवारी व रविवारी सुट्टी असल्याने सोमवारी पत्र द्यावे लागणार आहे.दरम्यान, मुंबईतील बैठकीलाही जिल्ह्यातील नेते गेले नाहीत. प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी बैठक बोलवली होती, पण नेत्यांनी त्याकडे पाठ फिरविली.

तुम्ही म्हणताय म्हणून पाठिंबा नाही!दरम्यान, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह राज्य नेतृत्वाकडून जिल्हा परिषदेत भाजपला पाठिंबा दिला जावा, यासाठी सांगितले जात आहे. मात्र, स्थानिक नेतृत्व वरिष्ठांच्या सूचनेशी सहमत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच शुक्रवारच्या मुंबईतील बैठकीकडे नेत्यांनी पाठ फिरविली. माजी मंत्री अजितराव घोरपडे, विलासराव जगताप आदींनी मुंबईच्या बैठकीकडे पाठ फिरविली.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (अजित पवार) गटनेतेपदी राजेश्वरी नाईक यांचे नाव आम्ही निश्चित केले आहे. त्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देण्यासाठी आम्ही गुरुवारी व शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात गेलो. मात्र, तांत्रिक त्रुटी काढत पत्र घेण्यात आले नाही. आम्हाला परत पाठविण्यात आले. प्रशासन कोणाच्या तरी दबावाखाली काम करत असून, गटनोंदणीस टाळाटाळ केली जात आहे. - विलासराव जगताप, माजी आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार).

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli NCP rift over BJP support; leaders skip Mumbai meeting.

Web Summary : Differences within Sangli NCP over supporting BJP surface as leaders skip Mumbai meeting called to discuss the issue. Administrative hurdles delay Raj Rajeshwari Naik's appointment as group leader. Local leaders disagree with state leadership's support for BJP, fueling internal conflict.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६SangliसांगलीNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा