शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: धूम स्टाइलने दागिने हिसकावून पळाले, गाडीवरुन पडल्याने पोलिसांना सापडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 19:15 IST

चोरट्यांकडून दुचाकीसह एक लाख वीस हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त

मिरज : येथील सांगली रस्त्यावर धूम स्टाइलने महिलेचे मंगळसूत्र हिसकावून दुचाकीवरून पोबारा करणाऱे नबी अली गरीब हुसेन इराणी (वय २२, रा. अकलूज), जोहीर अब्बास मोहसीन खान (१९, रा. दावणगिरी, कर्नाटक) हे दोघे चोरटे दुचाकी अपघातामुळे गांधी चौक पोलिसांना सापडले. दोघांना पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून चोरलेले मंगळसूत्र हस्तगत केले.संगीता रामचंद्र बंडगर या गुरुवारी मिरजेतील हॉस्पिटलमध्ये आल्या होत्या. त्या सांगली रस्त्यावर वंटमुरे कॉर्नर येथून चालत जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावत पळ काढला. मंगळसूत्र हातात आल्यानंतर दुचाकीस्वाराने वेगाने दुचाकी चालवली. दोघेही तासगाव रस्त्याने भरधाव वेगात जात असताना ते दुचाकीवरून पडून जखमी झाले. त्यांना नागरिकांनी उपचारासाठी मिरज सिव्हिलमध्ये दाखल केले.महिलेच्या मंगळसूत्र चोरीप्रकरणी गांधी चाैक पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांना चोरट्यांच्या दुचाकीचा क्रमांक मिळाला होता. चोरट्यांच्या दुचाकीचा अपघात होऊन त्यांना उपचारासाठी सिव्हिलमध्ये आणल्याची माहिती मिळाल्यानंतर दोघांना औषधोपचारानंतर ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून चोरलेले मंगळसूत्रही पोलिसांनी जप्त केले. दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली.चोरट्यांकडून दुचाकीसह एक लाख वीस हजार रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. पोलिस उपअधीक्षक अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव, उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे, धनंजय चव्हाण, अभिजित यमगर, अशरफ मणेर, प्रवीण हुक्कीरे, बसवराज कुंदगोळ, जावेद शेख, विकास कांबळे यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :SangliसांगलीtheftचोरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस