शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Dhananjay Munde: भावी मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच, धनंजय मुंडेंच्या भाकिताने चर्चा तर होणारच

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 09:57 IST

धनंजय मुंडेंनी राज ठाकरेंवर टिका करताना, आगामी काळात पक्ष संघटना वाढविण्याचेही भाष्य केले.

मुंबई -  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसवर जातीयवादाचा थेट आरोप केला. त्यामुळे राज्यात राष्ट्रवादीविरुद्ध मनसे असा सामना पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर मंत्री धनंजय मुंडेंनी सांगलीतील मेळाव्यात टिका केली. राज ठाकरे हे भाजपाचे अर्धवटराव आहेत. त्यामुळे ईडी घुसली आणि अर्धवटराव गप्प बसले असा टोला मुंडेंनी लगावला होता. या सभेत बोलताना मुंडेंनी भाजपवरही टिका केली असून पुढील मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचा होईल, असे भाकितच केले आहे.

धनंजय मुंडेंनी राज ठाकरेंवर टिका करताना, आगामी काळात पक्ष संघटना वाढविण्याचेही भाष्य केले. राज ठाकरे आज जे बोलतात ते उद्या त्यावर ठाम राहतीलच याची ग्वाही कोणीच देऊ शकत नाही. त्यामुळे अशा आरोपांना सामान्य जनता फारसे महत्त्वही देणार नाही. येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शंभरहून अधिक आमदार निवडून येतील आणि भावी मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच असेल, असे भाकितच त्यांनी येथील सभेत केले. मुंडेंच्या या भाकितामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टिकेमुळे धनंजय मुडेंना मनसेच्या नेत्यांकडून लक्ष्य केलं जात आहे. आमदार राजू पाटील, अमेय खोपकर आणि गजानन काळे यांनी टोला धनंजय मुंडेंना चांगलाचा टोला लगावला आहे.   

मुंडेंची अवस्था पाहून 'करुणा'च येते

मनसे आमदार राजू पाटील म्हणाले की, धनंजयराव, चौकश्यांचा गंजलेला खिळा घुसल्यामुळे तुम्हाला झालेल्या धनुर्वातातून तर ही प्रतिक्रिया आली नाही ना? तुमच्या बुडाखाली काय जळतंय व टोचतंय याची आम्हाला कल्पना आहे. त्यामुळे वायफळ बडबडीचा राग जरी येत असला तरी तुमची अशी अवस्था पाहून ‘करूणा’च अधिक येते असं सांगत त्यांनी धनंजय मुंडेंवर बोचरी टीका केली आहे.

धनंजय मुंडेंना 5 कोटींची मागणी

मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे एका महिलेने पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फेब्रुवारी आणि मार्चदरम्यान एका परिचित महिलेने धनंजय मुंडे यांना आंतरराष्ट्रीय नंबरवरून फोन करून खंडणीची मागणी केली. या महिलेने आपल्याकडे पाच कोटी रुपयांचं दुकान आणि एक महागडं घड्याळ मागितल्याचे धनंजय मुंडे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. तसेच ही मागणी पूर्ण न झाल्यास बलात्काराची तक्रार करण्याची तसेच सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी या महिलेने दिल्याचेही तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. 

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेChief Ministerमुख्यमंत्रीNCPराष्ट्रवादी काँग्रेसMNSमनसे