जंतनाशक दिन मोहिम 1 मार्चला व मॉप अप दिन 8 मार्चला राबविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 07:22 PM2021-02-26T19:22:42+5:302021-02-26T19:26:06+5:30

Health Sangli- राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिम सांगली जिल्ह्यामध्ये दि. 1 मार्च 2021 रोजी व मॉप अप दिन 8 मार्च 2021 रोजी राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत 1 ते 19 वर्षे वयोगटातील लाभार्थींना अल्बेंडेझॉल ची गोळी (जंतनाशक गोळी) देण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे यांनी दिली.

The deworming campaign will be held on March 1 and the mop up day will be held on March 8 | जंतनाशक दिन मोहिम 1 मार्चला व मॉप अप दिन 8 मार्चला राबविणार

जंतनाशक दिन मोहिम 1 मार्चला व मॉप अप दिन 8 मार्चला राबविणार

googlenewsNext
ठळक मुद्देजंतनाशक दिन मोहिम 1 मार्चला व मॉप अप दिन 8 मार्चला राबविणार1 ते 19 वर्षे वयोगटातील लाभार्थींना जंतनाशक गोळी देण्यात येणार- डॉ. मिलींद पोरे

सांगली : राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिम सांगली जिल्ह्यामध्ये दि. 1 मार्च 2021 रोजी व मॉप अप दिन 8 मार्च 2021 रोजी राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत 1 ते 19 वर्षे वयोगटातील लाभार्थींना अल्बेंडेझॉल ची गोळी (जंतनाशक गोळी) देण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे यांनी दिली.

1 ते 19 वर्षे वयोगटातील किमान 28 टक्के बालकांमध्ये आढळणारा आतड्यांचा कृमीदोष हा मातीतून प्रसारित होणाऱ्या जंतापासून होतो. याचे प्रमुख कारण म्हणजे वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचा अभाव असणे हे आहे. कृमीदोष हा रक्तक्षय आणि कुपोषणाचे कारण आहेच. तसेच बालकांची शारिरीक व बौध्दिक वाढ खुंटण्याचे कारण ठरते.

ही बाब लक्षात घेवून 1 ते 19 वर्षे वयोगटातील सर्व शालेय विद्यार्थी (शाळेतील व शाळाबाह्य) यांना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर गोळी देवून त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती व जीवनाचा दर्जा उंचावणे हा राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा उद्देश आहे.

या वर्षातील दुसऱ्या टप्प्याच्या जंतनाशक मोहिमेची अंमलबजावणी 1 मार्च राष्ट्रीय जंतनाशक दिन व 8 मार्च मॉप अप दिन संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबविला जाणार आहे. या मोहिमेसाठी लागणारा औषधसाठा प्राप्त झाला असून ग्रामीण क्षेत्रातील 5 लाख 4 हजार 455, नगरपालिका क्षेत्रातील 64 हजार 425 व महानगरपालिका क्षेत्रातील 1 लाख 21 हजार 578 असे एकूण 6 लाख 90 हजार 458 लाभार्थी आहेत.

या मोहिमेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका व जिल्हा स्तरावर आरोग्य अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, अंगणवाडी पर्यवेक्षक व सेविका, साधन शिक्षक, आशा यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. ही मोहिम अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. यामध्ये 3 हजार 56 अंगणवाडी सेविका, 2 हजार 868 साधन शिक्षक, 2 हजार 69 आशा व 896 आरोग्य कर्मचारी सहभागी आहेत.

1 ते 2 वर्षे वयोगटातील मुला-मुलींना 200 मिलीग्रॅमची गोळी चुरा / पावडर करूनच पाण्याबरोबर देण्यात येईल. 2 ते 19 वयोगटातील मुला-मुलींना 400 मिलीग्रॅमची गोळी चुरा / पावडर अथवा तुकडे करून चावून खाण्यास स्वच्छ पाण्याबरोबर देण्यात येणार आहे. ॲल्बेंडेझॉल गोळी उपाशीपोटी देण्यात येणार नाही.

गोळी खाल्यामुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. तथापी जंताचा प्रादुर्भाव (भुक कमी, वजन कमी आणि गालावर पांढरे चट्टे) असल्यास किरकोळ पोटदुखी, जळजळ अथवा क्वचित प्रसंगी मुलांना उलटी होऊ शकते. हे दुष्परिणाम किरकोळ स्वरूपाचे असल्याने पालकांनी घाबरून जावू नये. अंगणवाडी व शाळेतील सर्व मुलांना गोळी खाण्यास दिल्यापासून दोन तास संपेपर्यंत मुलांना त्रास आहे किंवा कसे याची खात्री अंगणवाडी सेविका/आरोग्स सेवक/सेविका/साधन शिक्षक/आरोग्य सहाय्यक झ्र सहाय्यीका यांच्यामार्फत करण्यात येणार आहे.

पालकांनी घाबरून न जाता कोणत्याही वयोगटातील मुलांना त्रास होत असल्यास त्वरीत आशा/ आरोग्य सेविका / सेवक / आरोग्य सहाय्यिका / सहाय्यक / साधन शिक्षक अथवा वैद्यकिय अधिकारी (प्राथमिक आरोग्य केंद्र) यांच्याशी संपर्क साधावा. आजारी असणारे बालक / किशोर / किशोरी यांना जंतनाशक दिनी / मॉप अप दिनी ॲल्बेंडेझोलची गोळी (जंतनाशक गोळी) देण्यात येणार नाही.

तथापी त्यांना ते पूर्णत: बरे झाल्यानंतर जंतनाशक गोळी वैद्यकिय अधिकारी यांच्या सल्ल्याने देण्यात येणार आहे. 1 मार्च रोजी अल्बेंडेझॉलची गोळी काही कारणाने घेतली नसल्यास दि. 8 मार्च मॉप अप राऊंड दिवशी ही गोळी देण्यात येणार असल्याचे डॉ. पोरे यांनी सांगितले.

 

Web Title: The deworming campaign will be held on March 1 and the mop up day will be held on March 8

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.