शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
2
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
3
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
4
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
5
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
6
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
7
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
8
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
9
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
10
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
11
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
12
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
13
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
14
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
15
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
16
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
17
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
18
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
19
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
20
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...

Lok Sabha Election 2019 लोकसभेच्या प्रचाराची जिल्ह्यात सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 11:54 PM

सांगली : आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, सभा, बैठका, पदयात्रा-भेटीगाठींचे कार्यक्रम, ध्वनिक्षेपकावरून तसेच डिजिटल पडद्यावरील चित्रफितींमधून घुमणारे आवाज रविवारी सायंकाळी सहानंतर शांत ...

सांगली : आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, सभा, बैठका, पदयात्रा-भेटीगाठींचे कार्यक्रम, ध्वनिक्षेपकावरून तसेच डिजिटल पडद्यावरील चित्रफितींमधून घुमणारे आवाज रविवारी सायंकाळी सहानंतर शांत झाले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता झाल्यानंतर, आता मतदारराजाचा कौल कोणाला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मंगळवारी, २३ एप्रिलला सांगली, हातकणंगले मतदारसंघासाठी मतदान होत असून प्रशासन त्यासाठी सज्ज झाले आहे.रविवारी प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सांगलीत दिग्गजांच्या प्रचारतोफा धडधडल्या. भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सांगलीत आणि नितीन गडकरी यांची विट्यात सभा झाली, तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगलीतील सभेने काँग्रेस महाआघाडीच्या प्रचाराची सांगता केली. वंचित बहुजन आघाडीने जिल्हाभरात पदयात्रा काढल्या.सांगली, हातकणंगले लोकसभा मतदारसंघांची निवडणूक यंदा राज्यात लक्षवेधी ठरल्याने अनेक दिग्गज नेत्यांनी सभा घेऊन प्रचाराचा धुरळा उडविला. सांगलीत भाजपतर्फे खासदार संजयकाका पाटील, काँग्रेस महाआघाडीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे विशाल पाटील, तर वंचित बहुजन आघाडीतर्फे गोपीचंद पडळकर यांच्यात चुरस असून, हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी व शिवसेनेचे धैर्यशील माने यांच्यात जोरदार लढत होत आहे.वसंतदादा पाटील यांचे नातू म्हणून विशाल पाटील यांच्या ताकदीची, तसेच राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील यांच्या प्रतिष्ठेची, जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष बनलेल्या भाजपच्या नेत्यांची व खासदार संजयकाका पाटील यांच्या अस्तित्वाची, तर शेतकऱ्यांचे नेते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाची परीक्षा घेणारी ही निवडणूक मानली जात आहे. तुल्यबळ उमेदवारांमुळे या दोन्ही मतदारसंघात जोरदार चुरस दिसत आहे. त्यामुळे प्रचाराची सांगता झाल्यानंतर, आता मतांचा कौल कोणाला, टक्केवारी वाढणार की कमी होणार, त्याचा लाभ कोणाला होणार, अशा चर्चांना उधाण आले आहे.प्रशासकीय पातळीवर सर्व तयारी पूर्ण झाली असून, सोमवारी नियुक्त अधिकारी व कर्मचारी मतदान केंद्रांचा ताबा घेणार आहेत. जिल्ह्यात एकूण २३ लाख ६३ हजार १२८ मतदार असून, सांगली मतदारसंघात १८ लाख ३ हजार मतदान आहे.सांगली मतदारसंघात ९ लाख २३ हजार २३२ पुरुष, तर ८ लाख ७३ हजार ७४९ स्त्री मतदार आहेत. हातकणंगले मतदार संघातील वाळवा, शिराळा विधानसभा मतदारसंघांमध्ये ५ लाख ६0 हजार 0७४ मतदारसंख्या आहे. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात २ लाख ६९ हजार २९५, तर शिराळा विधानसभा मतदारसंघात २ लाख ९0 हजार ७७९ इतके मतदार आहेत.आज सर्व साहित्याचे वितरण होणारमतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या पोलिंग पार्टीला सोमवारी ईव्हीएम बॅलेटसह सर्व साहित्याचे वितरण केले जाईल. विधानसभानिहाय करण्यात आलेल्या स्ट्राँग रुम परिसरात साहित्याचे वितरण दिवसभर चालेल. सर्व पोलिंग पार्टी सायंकाळपर्यंत आपापल्या मतदान केंद्रांवर पोहोचतील, मतदानाची व्यवस्था करतील आणि तसा अहवाल सादर करतील.उद्या सकाळी सहा वाजता ‘मॉक पोल’मतदान केंद्रावर सकाळी सहा वाजता ‘मॉक पोल’ घेण्यात येईल. यात सर्व उमेदवार व नोटांसह ५० मते टाकण्यात येतील. हे ‘मॉक’ पोलिंग एजंटच्या उपस्थितीत होईल. यासाठी पोलिंग एजंटला कुठल्याही परिस्थितीत सकाळी सव्वासहापर्यंत मतदान केंद्रात पोहोचावे लागेल. ते न आल्यास ‘मॉक पोल’ सुरूकेले जाईल. ते सातपर्यंत चालेल. सात वाजल्यापासून प्रत्यक्ष मतदानास सुरुवात होईल.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक