मुक्तसंचार करणाऱ्या तिघा बाधितांची कोविड सेंटरला रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:18 IST2021-06-27T04:18:45+5:302021-06-27T04:18:45+5:30
सांगली : महापालिका क्षेत्रात कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा वाढत असल्याने महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी अॅक्शन मोडवर येत रामनगरमध्ये मुक्तसंचार ...

मुक्तसंचार करणाऱ्या तिघा बाधितांची कोविड सेंटरला रवानगी
सांगली : महापालिका क्षेत्रात कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा वाढत असल्याने महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी अॅक्शन मोडवर येत रामनगरमध्ये मुक्तसंचार करणाऱ्या तिघा कोरोनाबाधित तरुणांची महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये रवानगी केली.
गृहविलगीकरणात असणारे रुग्ण रस्त्यावर फिरताना दिसल्यास त्याला महापालिकेच्या कोरोना सेंटरमध्ये भरती केले जाईल, असा इशारा कापडणीस यांनी दिला आहे.
त्यांनी शहरात गर्दीच्या ठिकाणी बिनधास्त फिरणाऱ्या नागरिकांची कोविड तपासणी सुरू केली आहे. अशातच सांगलीतील कोल्हापूर रोडवरील वाॅर्ड क्रमांक १४मध्ये रामनगर पहिली गल्ली येथे राहत असलेली तीन मुले कोरोनाबाधित असताना बाहेर फिरत असल्याचे महापालिकेच्या आरोग्यसेविकांकडून माहिती मिळताच प्रशासनाकडून त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून मिरज येथे कोविड सेंटरला स्थलांतरित करण्यात आले.
गृहविलगीकरणात असणाऱ्या कोरोनाबाधितांनी क्वाॅरण्टाइन कालावधीत घरीच अलगिकरणात थांबायचे आहे. जर अशा व्यक्ती घराबाहेर रस्त्यावर आढळून आल्यास त्यांना शासकीय कोरोना सेंटरला दाखल केले जाईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.