सांगलीत कृष्णा नदीच्या पात्रात उतरून निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 10:18 PM2020-03-01T22:18:06+5:302020-03-01T22:18:14+5:30

सांगली : कृष्णा नदीवरील आयर्विनला पर्यायी पूल उभारण्यास नागरिक, व्यापाऱ्यांचा विरोध आहे. तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विरोध डावलून पुलाचे ...

Demonstrations descending on the banks of the river Krishna in Sangli | सांगलीत कृष्णा नदीच्या पात्रात उतरून निदर्शने

आयर्विनच्या पर्यायी पुलाविरोधात दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांनी कृष्णा नदीपात्रात उतरून आंदोलन केले.

Next

सांगली : कृष्णा नदीवरील आयर्विनला पर्यायी पूल उभारण्यास नागरिक, व्यापाऱ्यांचा विरोध आहे. तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विरोध डावलून पुलाचे काम सुरू करण्यात येणार आहे. याचा निषेध करण्यासाठी दलित महासंघाच्यावतीने रविवारी नदीच्या पाण्यात बसून आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते, महेश देवकुळे, अजित आवळे, शुभम सोनवले, मारुती भोसले, बापू कांबळे, महावीर चंदनशिवे, रामभाऊ पाटील, सागर साळुंखे यांनी केले. मोहिते म्हणाले की, आयर्विनच्या पर्यायी पुलाला सांगलीतील नागरिकांचा, व्यापाऱ्यांसह सांगलीवाडीतील रहिवाशांचा विरोध कायम आहे. येत्या १५ दिवसात पुलाचे काम प्रत्यक्षात सुरू होईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले आहे. पर्यायी पुलाची निविदा प्रक्रिया पूर्ण करून ठेकेदाराला वर्कआॅर्डरही दिलेल्या आहेत. परंतु या पुलामुळे मुख्य बाजारपेठ, हरभट रोड, कापडपेठ, सराफ पेठेत वाहतुकीची कोंडी होणार आहे. अवजड वाहनांची वाहतूक पुन्हा सुरू होणार आहे. परिणामी व्यापाºयांचे मोठे नुकसान होईल. सांगली-इस्लामपूर या मार्गाला जोडणाºया पुलासाठी अन्य पर्याय शोधावेत, आयर्विननजीक पूल उभारण्यास विरोध आहे. तरीही बांधकाम विभागाने पूल उभारण्याची घोषणा केल्याने त्याच्या निषेधार्थ पाण्यात उतरून आंदोलन केले आहे.

Web Title: Demonstrations descending on the banks of the river Krishna in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.