शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत ट्रकखाली चिरडून महिला ठार, चालकाचे पलायन : नागरिकांकडून ट्रकची मोडतोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 13:25 IST

भरधाव ट्रकने जोराची धडक दिल्याने ४० ते ४५ वर्षीय अनोळखी महिला चाकाखाली चिरडून जागीच ठार झाली. शंभरफुटी रस्त्यावर पाकीजा मस्मिदसमोर सोमवारी रात्री साडेदहा वाजता हा अपघात झाला. अपघातानंतर चालकाने ट्रक सोडून पलायन केले. त्यामुळे संतप्त नागरिकांनी ट्रकवर दगडफेक करुन त्याची मोडतोड केली.

ठळक मुद्देसांगलीत ट्रकखाली चिरडून महिला ठारचालकाचे पलायन : नागरिकांकडून ट्रकची मोडतोड

सांगली : भरधाव ट्रकने जोराची धडक दिल्याने ४० ते ४५ वर्षीय अनोळखी महिला चाकाखाली चिरडून जागीच ठार झाली. शंभरफुटी रस्त्यावर पाकीजा मस्जिद समोर सोमवारी रात्री साडेदहा वाजता हा अपघात झाला. अपघातानंतर चालकाने ट्रक सोडून पलायन केले. त्यामुळे संतप्त नागरिकांनी ट्रकवर दगडफेक करुन त्याची मोडतोड केली.मृत अनोळखी महिला गेल्या अनेक वर्षापासून पाकीजा मस्जिद परिसरात फिरत होती. दिवसभर मस्जिदजवळ बसून असायची. घरोघरी जाऊन मागून जेवण खात असे.

सोमवारी रात्री ती रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करीत होती. त्यावेळी कोल्हापूर रस्त्याकडे भरधाव वेगाने निघालेल्या सोळाचाकी ट्रकने (क्र. टीएन २८ एआर ४६६६) तिला जोराची धडक दिली. यामध्ये ही महिला ट्रकच्या मागील चाकाखाली सापडली.

अंगावरुन चाक गेल्याने प्रचंड रक्तस्त्राव होऊन तिचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार पाहून चालकाने ट्रक थांबविला. पण अंधाराचा फायदा घेत तो पळून गेला. अपघाताचे वृत्त समजताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली.

परिसरात घरोघरी मागून खाणाऱ्या महिलेचा मृत्यू झाल्याचे समजताच संतप्त नागरिकांनी ट्रकवर दगडफेक करुन त्याची मोडतोड केली. शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. अपघातग्रस्त ट्रक जप्त केला आहे. मृतदेहाची अजून ओळख पटली नाही.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघात