ट्रकच्या धडकेत महिला जागीच ठार

By admin | Published: January 10, 2017 02:46 AM2017-01-10T02:46:40+5:302017-01-10T02:46:40+5:30

पुणे-नाशिक महामार्गावर कुरुळी गावच्या हद्दीत आळंदी फाट्यावर दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात महिला कामगार जागीच ठार झाली आहे.

A woman was killed on the spot by truck | ट्रकच्या धडकेत महिला जागीच ठार

ट्रकच्या धडकेत महिला जागीच ठार

Next

चाकण : पुणे-नाशिक महामार्गावर कुरुळी गावच्या हद्दीत आळंदी फाट्यावर दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात महिला कामगार जागीच ठार झाली आहे. ही घटना आज ( दि. ९ ) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.
उषा कैलास काळे (वय २५, रा. गवतेवस्ती, मेदनकरवाडी, चाकण, मुळगाव - बुमराळा, ता. लोणार, जि. बुलढाणा) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.
उषा ह्या आळंदी फाट्यावरील राधेश्याम एंटरप्रायजेस या कंपनीतून कामावरून सुटून आपल्या आतेभावाच्या दुचाकीवरून ( क्र. एम.एच. १४-एफ एफ- ६५२२) घरी जात होत्या.
यावेळी एन टी बी कंपनीजवळ पाठीमागून आलेल्या ट्रकची (क्र. एम.एच.१२- डीटी- ५४७५ ) जोरदार धडक बसल्याने त्या दुचाकीवरून खाली पडल्या. त्यांच्या अंगावरून ट्रक गेल्याने चेंदामेंदा होऊन त्या जागीच ठार झाल्या.

Web Title: A woman was killed on the spot by truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.