सातारा : देवदर्शनाहून परतणाऱ्या ट्रॅक्सचा भीषण अपघात, महिला जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 02:26 PM2018-05-29T14:26:46+5:302018-05-29T14:27:10+5:30

देवदर्शनाहून घरी परतणाऱ्या भरधाव ट्रॅक्सने बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात थांबलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. ही घटना पहाटे पाच वाजता घडली. या भीषण अपघातात एक महिला जागीच ठार झाली. तर चारजण गंभीर जखमी झाले आहेत. चांदबाई बाळकू डोंगरे (वय ६०, रा. करोशी, ता. चिक्कोडी, बेळगाव) असे मृत महिलेचे नाव आहे.

Satara: The fatal accident of trucks returning from devescence | सातारा : देवदर्शनाहून परतणाऱ्या ट्रॅक्सचा भीषण अपघात, महिला जागीच ठार

सातारा : देवदर्शनाहून परतणाऱ्या ट्रॅक्सचा भीषण अपघात, महिला जागीच ठार

Next
ठळक मुद्देदेवदर्शनाहून परतणाऱ्या ट्रॅक्सचा भीषण अपघातएक महिला जागीच ठार, तर चार जखमी

सातारा : देवदर्शनाहून घरी परतणाऱ्या भरधाव ट्रॅक्सने बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात थांबलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. ही घटना पहाटे पाच वाजता घडली. या भीषण अपघातात एक महिला जागीच ठार झाली. तर चारजण गंभीर जखमी झाले आहेत. चांदबाई बाळकू डोंगरे (वय ६०, रा. करोशी, ता. चिक्कोडी, बेळगाव) असे मृत महिलेचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, शिर्डी, शनी-शिंगणापूर, त्र्यंबकेश्वर आदी ठिकाणांहून देवदर्शन घेऊन बेळगावला परतणाऱ्या ट्रॅक्सने (केए २३ एम ९३२८) सातारा शहरानजीक बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात उभ्या असलेल्या (एमएच ०४ एफडी ४९६७) ट्रकला जोरात ठोकर मारली.

या अपघातात ट्रॅक्समध्ये बसलेल्या चांदबाई बाळकू डोंगरे यांचा जागीच मृत्यू झाला. तर रुक्मिणी डोंगरे, नीता डोंगरे, सूरज डोंगरे, मंजुळा डोंगरे (सर्व रा. करोशी, चिक्कोडी) जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच सातारा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम करीत आहेत.

Web Title: Satara: The fatal accident of trucks returning from devescence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.