शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पैशाशिवाय सहकार्य होत नाही, दोन हजार रुपये लाचेची मागणी; सांगली जिल्हा परिषदेचे दोन अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 15:15 IST

असा लावला सापळा

सांगली : भविष्य निर्वाह निधीमधील मंजूर पाच लाख रुपयांच्या रकमेचा प्रस्ताव कोषागार कार्यालयाकडे पाठविण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना गुरुवारी जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाकडील दोन अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. वरिष्ठ सहाय्यक लेखा अधिकारी पूजन विलास भंडारे (वय ३१, रा. जुना स्टॅण्ड रोड, भोई गल्ली, कासेगाव, ता. वाळवा) व कनिष्ठ सहाय्यक लेखा अधिकारी निखिल राजीव कांबळे (३५, रा. माता सावित्रीबाई फुले सोसायटी, नांदणी रोड, जयसिंगपूर) अशी लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहेत. त्यांच्यावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईने जिल्हा परिषदेत खळबळ उडाली होती.याबाबत माहिती अशी की, तक्रारदार हे शासकीय नोकरदार असून त्यांचे भविष्य निर्वाह निधीमधील पाच लाख रुपये काढण्याचा प्रस्ताव मंजूर झाला होता. हा प्रस्ताव कोषागार कार्यालयाकडे पाठविण्यात आला नव्हता. पैशासाठी सहकार्य होत नाही, असे म्हणत गुरुवारी लेखाधिकारी भंडारे यांनी तक्रारदारांकडे लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची पडताळणी केली असता भंडारे यांनी दोन हजार ५०० रुपयांची लाचेची मागणी केल्याचे व कनिष्ठ सहाय्यक निखिल कांबळे यांनी या चर्चेत सहभागी होऊन तक्रारदाराला लाच देण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक यास्मिन इनामदार, निरीक्षक किशोरकुमार खाडे, अंमलदार प्रीतम चौगुले, अजित पाटील, उमेश जाधव, चंद्रकांत जाधव, पोपट पाटील, ऋषिकेश बडणीकर, धनंजय खाडे, सुदर्शन पाटील, सलीम मकानदार, रामहरी वाघमोहे, अतुल मोरे, सीमा माने, वीणा जाधव यांच्या पथकाने केली.असा लावला सापळागुरुवारी जिल्हा परिषदेच्या भविष्य निर्वाह निधी वित्त विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावला. तक्रारदारांकडून दोन हजाराची लाच घेताना भंडारे यांना पथकाने रंगेहात पकडले तर कांबळे यालाही कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले. दोघांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Zilla Parishad officials caught accepting bribe for fund proposal.

Web Summary : Two Sangli Zilla Parishad officials were arrested for accepting a ₹2,000 bribe to forward a ₹5 lakh fund proposal. The Anti-Corruption Bureau caught senior assistant Pooja Bhandare and junior assistant Nikhil Kamble red-handed, leading to their arrest and a police investigation.