शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: सातबारावर नोंदीसाठी ५० हजार रुपये लाचेची मागणी, तलाठ्यासह एजंटला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 15:53 IST

सांगली : एक गुंठा शेत जमीन क्षेत्राची सात बारा उताऱ्यावर नोंदणी करण्यासाठी ५० हजार रुपये लाचेची मागणी केल्याबद्दल कर्नाळ ...

सांगली : एक गुंठा शेत जमीन क्षेत्राची सात बारा उताऱ्यावर नोंदणी करण्यासाठी ५० हजार रुपये लाचेची मागणी केल्याबद्दल कर्नाळ (ता. मिरज) चा तलाठी तानाजी पांडुरंग फराकटे (वय ४९, रा. फ्लॅट न. ५, हिरा अपार्टमेंट, एसटी कॉलनी, विश्रामबाग) व एजंट गणेश विश्वास कांबळे (वय ३०, रा. पद्माळे, ता. मिरज) या दाेघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.यातील तक्रारदार यांनी कर्नाळ येथे एक गुंठा जमीन खरेदी केली होती. एक गुंठा शेत जमीन क्षेत्राची सात बारा उताऱ्यावर नोंदणी करण्यासाठी तलाठी फराकटे यांची भेट घेतली. तेव्हा फराकटे याने ५० हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबतची तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे २८ जानेवारी २०२५ रोजी तक्रार दिली. तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २९ व ३० जानेवारी रोजी पडताळणी केली. तेव्हा तलाठी फराकटे यांचे पंचाच्या समक्ष ५० हजार रुपये लाचेची मागणी केली. तसेच तडजोडीअंती ४० हजार रुपये लाचेची मागणी करून एजंट गणेश कांबळे याला जाऊन भेटण्यास सांगितले.तसेच पडताळणी दरम्यान एजंट कांबळे याने देखील तक्रारदार यांच्या कामासाठी ५० हजार रुपये लाचेची मागणी केली. तसेच रक्कम कमी करण्याची विनंती केली. त्याने देखील तलाठी कांबळे यांना भेटा असे सांगून लाच देण्यास प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले आहे. दोघांनी प्रत्यक्षात लाच स्वीकारली नाही. परंतु मागितल्याचे निष्पन्न झाल्यामुळे गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई केली.उपअधीक्षक उमेश पाटील, निरीक्षक किशोरकुमार खाडे, कर्मचारी ऋषिकेश बडणीकर, सलीम मकानदार, चंद्रकांत जाधव आदींच्या पथकाने कारवाई केली.

टॅग्स :SangliसांगलीBribe Caseलाच प्रकरणCrime Newsगुन्हेगारीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग