'कृष्णा'च्या तज्ज्ञ संचालकपदी दीपक पाटील, श्रीरंग देसाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:32 IST2021-08-18T04:32:20+5:302021-08-18T04:32:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिरटे : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या तज्ज्ञ संचालकपदी दीपक वसंतराव पाटील (तांबवे, ता. वाळवा) ...

'कृष्णा'च्या तज्ज्ञ संचालकपदी दीपक पाटील, श्रीरंग देसाई
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरटे : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या तज्ज्ञ संचालकपदी दीपक वसंतराव पाटील (तांबवे, ता. वाळवा) आणि श्रीरंग शंकर देसाई (आणे, ता. कऱ्हाड)
यांची निवड करण्यात आली. कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते नूतन तज्ज्ञ संचालकांचा सत्कार करण्यात आला.
कारखान्याच्या नूतन संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत तज्ज्ञ संचालकपदी श्रीरंग देसाई व दीपक पाटील यांची निवड केली. श्रीरंग देसाई व दीपक पाटील या दोघांनीही कृष्णा कारखान्यात यापूर्वी माजी संचालक म्हणून काम पाहिले आहे. गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ ते सहकार, ग्रामीण विकास क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत डॉ. सुरेश भोसले यांनी त्यांना तज्ज्ञ संचालक म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. या निवडीनंतर समर्थक कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, संचालक लिंबाजी पाटील, दयानंद पाटील, जितेंद्र पाटील, संजय पाटील, संभाजीराव पाटील, शिवाजी पाटील, जयवंत मोरे, इंदुमती जाखले, वसंतराव शिंदे, अविनाश खरात, बँक प्रतिनिधी शिवरुपराजे निंबाळकर-खर्डेकर, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, माजी संचालक पांडुरंग होनमाने, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक निवासराव पाटील आदी उपस्थित होते.