मान्सूनचा सामना करण्यासाठी यंत्रणांनी युध्दपातळीवर सज्जता ठेवावी - चौधरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 17:14 IST2020-05-06T17:09:07+5:302020-05-06T17:14:49+5:30
सांगली : यावर्षी चांगल्या मान्सूनचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्याने गतवर्षी प्रमाणेच यावर्षी सुध्दा जिल्ह्याला पूराचा सामना करावा लागू शकतो. ...

मान्सूनचा सामना करण्यासाठी यंत्रणांनी युध्दपातळीवर सज्जता ठेवावी - चौधरी
सांगली : यावर्षी चांगल्या मान्सूनचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्याने गतवर्षी प्रमाणेच यावर्षी सुध्दा जिल्ह्याला पूराचा सामना करावा लागू शकतो. याची जाणीव ठेवून यंत्रणांनी युध्दपातळीवर आवश्यक ती सर्व सज्जता ठेवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आयोजित मान्सून पूर्व तयारी आढावा बैठकीत ते बोलत होते.मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक
सुहेल शर्मा, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी
चौगुले-बर्डे, तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत प्रत्येक विभागाने आपत्ती व्यवस्थापन
आराखडा तयार ठेवावा. सर्व यंत्रणांनी कंट्रोल रूम तयार करून 24 ७ 7 जिल्हा आपत्ती घटना
प्रतिसाद प्रणाली कार्यान्वित ठेवावी. जिल्हा आणि तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांनी संभाव्य
आपत्ती टाळण्यासाठी सतर्क, दक्ष राहावे. संभाव्य आपत्ती काळात परस्पर समन्वय ठेवावा, असे पाटबंधारे विभागाने संभाव्य पूरस्थिती हाताळण्यासाठी आत्तापासूनच नियोजन करावे.
- कोयना धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग सांगली जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरतो. त्यामुळे कोयना धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग व त्याचा सांगली जिल्ह्यावर होणारा परिणाम याची शास्त्रशुध्द माहिती प्रशासनाला तात्काळ मिळणे अनिवार्य आहे. त्यासाठी रिअल टाईम इंन्फॉर्मेशन सिस्टीम त्वरीत कार्यान्वीत करा. धरण व्यवस्थापन काटेकोर व्हावे यासाठी सुक्ष्म आराखडा तयार करा व त्याची काटेकोर अंमलबजावणी करा.नदीतील पुराची पातळीआणि त्यामुळे पाण्याखाली येणारी गावे तसेच भाग याची सविस्तर माहिती पाटबंधारे विभागाने जनतेसाठी वेळोवेळी द्यावी.
लँडलाईन, इंटरनेट आणि मोबाईल यंत्रणा सक्षमपणे सुरू रहावी यासाठी आत्ताच आवश्यक ती तजवीजठेवावी व त्यांची रंगीत तालीम घ्यावी महाराष्ट्र जीवनप्राधिकरण आणि जिल्हा परिषदेची ग्रामीण पाणीपुरवठा यंत्रणा यांनी पूरग्रस्त भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी नियोजन करावे.महानगरपालिकेकउील आपत्ती व्यवस्थापन कंट्रोल रूम पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्यासाठी आवश्यक ते नियोजन करावे. महानगरपालिकेनेही वार्डनिहाय आपत्ती व्यवस्थापन दल तयार करावे ,कंट्रोल रूमचे प्रोटोकोल काम करणाऱ्या
अधिकारी, कर्मचाऱ्यांना माहित व्हावे, यासाठी आवश्यक ट्रेनिंग घ्यावे. संवाद यंत्रणा सुरळीत
रहावी यासाठी बीएसएनएलने आवश्यक ती काळजी घ्यावी. तालुका व ग्रामस्तरावरील रेस्कू
टीमची यादी तयार करावी, अशा सूचना दिल्या.