शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

नुकसान आठ लाखांचे, भरपाई अठरा हजारांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 17:49 IST

हेक्टरी आठ ते दहा लाखांचा फटका द्राक्ष बागायतदारांना बसला आहे. उत्पन्नापासून वंचित राहावे लागलेच, मात्र घातलेल्या खर्चाचा भुर्दंडही सोसावा लागला आहे. शासनाकडून भरीव मदत मिळेल, या आशेवर द्राक्ष बागायतदार होते. मात्र खर्च आणि नुकसानीच्या तुलनेत केवळ मदतीची पाने तोंडाला पुसण्यात आल्याने द्राक्ष उत्पादक कर्जाच्या खाईत लोटले आहेत.

दत्ता पाटील ।तासगाव : परतीच्या पावसाने द्राक्षबागांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. पंचनाम्यांनंतर राज्यपालांकडून तुटपुंजी रक्कम जाहीर करण्यात आली. त्यामुळे नुकसान अन् कर्जाच्या खाईत गेलेल्या द्राक्ष बागायतदारांचा भ्रमनिरास झाला आहे. नुकसान आठ लाखांचे अन् भरपाई अठरा हजारांची, असेच चित्र असून भरपाईची रक्कम ही शेतकºयांच्या एक दिवसाच्या औषध खर्चापेक्षाही कमी आहे. त्यामुळे नुकसान भरपाईच्या रकमेत वाढ करून सरसकट पीककर्ज माफ करावे, अशी मागणी होत आहे.

नेहमीच दुष्काळाच्या सावटात असणाºया द्राक्षबागांना यंदा अतिवृष्टीचा सामना करावा लागला. परतीच्या पावसाने सलग आठ दिवस झोडपून काढल्याने, तालुक्यातील पीक छाटणी घेतलेल्या द्राक्षबागांना मोठा फटका बसला. ऐन हंगामात पावसाने झोडपून काढण्यास सुरुवात केल्याने शेतकºयांनी मोठ्या जिद्दीने द्राक्षबागा वाचवण्यासाठी धडपड सुरु केली. द्राक्षबागा वाचतील या आशेने आठ दिवसांत केवळ औषध फवारणीसाठी लाखभर रुपये खर्च केले. मात्र इतके करूनही द्राक्षबागा वाचल्या नाहीत.

द्राक्ष उत्पादनासाठी वर्षभर कष्ट करून, खते, औषधे, मजुरीसाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात. वर्षभर राबल्यानंतर एकरी तीन ते आठ लाखापर्यंत उत्पन्न मिळते. मात्र   यावर्षी पावसाने झोडपून काढल्याने तालुक्यातील बहुतांश द्राक्षबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. प्रशासनाच्या पंचनाम्यानुसार तालुक्यातील ८ हजार ६०० हेक्टर द्राक्षबागांचे नुकसान   झाले आहे. हेक्टरी आठ ते दहा लाखांचा फटका द्राक्ष बागायतदारांना बसला आहे. उत्पन्नापासून वंचित राहावे लागलेच, मात्र घातलेल्या खर्चाचा भुर्दंडही सोसावा लागला आहे.

शासनाकडून भरीव मदत मिळेल, या आशेवर द्राक्ष बागायतदार होते. मात्र खर्च आणि नुकसानीच्या तुलनेत केवळ मदतीची पाने तोंडाला पुसण्यात आल्याने द्राक्ष उत्पादक कर्जाच्या खाईत लोटले आहेत.द्राक्ष बागायतदारांना मदतीचा हात देण्यासाठी सरसकट पीककर्ज माफ करून भरीव मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी