शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

आटपाडी तालुक्यात पाण्यासाठी दाहीदिशा

By admin | Updated: May 19, 2017 00:36 IST

आटपाडी तालुक्यात पाण्यासाठी दाहीदिशा

अविनाश बाड । लोकमत न्यूज नेटवर्कआटपाडी : आटपाडी तालुक्यात सध्या २१ टॅँकरने ५१ खेपा करून पाणी टंचाईवर मात करण्याचा केविलवाणा प्रयत्न प्रशासनाकडून सुरु आहे. तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. टॅँकर सुरु असणाऱ्या अनेक गावात १० ते १२ दिवसांतून नागरिकांना पाणी मिळत आहे. उन्हामुळे पाणी मिळविण्यासाठी नागरिकांची दाहीदिशा भटकंती सुरु आहे. दिवसेंदिवस टॅँकरच्या मागणीत वाढच होत आहे.तालुक्यातील खरीप आणि रब्बी हंगामात ५० पैशांपेक्षा जास्त आणेवारी जाहीर करुन प्रशासनाने कागदोपत्री दुष्काळ संपुष्टात आणला आहे. प्रत्यक्षात मात्र ३ फेब्रुवारीपासून तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकर सुरु करावे लागले आहेत. आणेवारी जादा असल्याने टंचाई जाहीर झाली नाही आणि त्यामुळे टॅँकर मंजुरीचे अधिकार तहसीलदारांऐवजी जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर राहिले. त्यामुळे सुरुवातीला टॅँकर मंजुरी लाल फितीत अडकून पडली.सध्या कौठुळी, देशमुखवाडी, भिंगेवाडी, उंबरगाव, पिंपरी बुद्रुक, पुजारवाडी (दिघंची), आवळाई, शेटेवाडी, दिघंची, पिंपरी खुर्द, माडगुळे, खोजानवाडी, बनपुरी, करगणी, बोंबेवाडी, झरे, विभुतवाडी, कुरुंदवाडी, आटपाडी (वाड्या-वस्त्या), आपटे मळा, आंबेवाडी, विठलापूर, मुंढेवाडी, निंबवडे (वाड्या-वस्त्या), लेंगरेवाडी, तडवळे, चिंचोळे, आवळाई वाड्या-वस्त्यांवर २१ टॅँकरच्या दररोज ५१.७५ खेपा कागदोपत्री तरी होत आहेत. तालुक्यातील ३४ हजार ९६८ एवढी लोकसंख्या टॅँकरची वाट पाहत, पाणी टंचाईच्या झळा सोसत कसेबसे दिवस ढकलीत आहे.दररोज एका नागरिकाला २० लिटर याप्रमाणे हिशेब करुन टॅँकर मंजूर केले जातात. प्रत्यक्षात कुटुंबाला याप्रमाणे पाणी देणे शक्य नसल्याने, टॅँकरचे पाणी १० ते १२ दिवस साठवून लोकांना प्यावे लागत आहे. काही गावात टॅँकरचे पाणी इंजिनने ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीत चढविले जाते. त्यामुळे वितरण योग्य होत असले तरी, लोकांना अनेक दिवसांनंतर पाणी मिळते. टॅँकरच्या पाण्यावरुन अनेक गावात दररोज किरकोळ वादावादीचे आणि हाणामारीचे प्रसंग घडत आहेत. यावर मात करण्यासाठी लोक पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. वळीव पावसानेही तालुक्याला हुलकावणी दिली आहे. विहिरींनी तळ गाठला आहे. टॅँकरवाले आणि टग्यांची चंगळ!सध्या सुरू असलेले टॅँकर हे त्या-त्या गावापासून किमान ८ ते तब्बल २५ कि. मी. अंतरावरुन पाणी आणत आहेत. यामध्ये अनेक ठिकाणी बिघाडाच्या नावाखाली खेपा चुकविल्या जात आहेत. प्रत्यक्षात दररोज १०० टक्के टॅँकर दाखविले जातात. त्यात गावच्या सरपंचांसह सरकारीबांबूचे टॅँकरवाले हात ओले करुन टॅँकरच्या निधीवर डल्ला मारत असल्याचा आरोप केला जातोय. याशिवाय जवळच्या अंतरावरुन खेपा टाकून लांबचे अंतर दाखवून टॅँकरवाले मालामाल होत असल्याची चर्चा आहे.