सांगलीत एकाचा कान कापून खून विजयनगरमधील घटना : मृतदेह दुसरीकडे फेकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 12:59 IST2018-10-01T12:56:17+5:302018-10-01T12:59:55+5:30
सांगली-मिरज रस्त्यावर विजयनगर येथे ३५ ते ४० वर्षीय अनोळखी व्यक्तीचा कान कापून निर्घृण खून केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. मृतदेहाची अजूनही ओळख पटलेली नाही

सांगलीत एकाचा कान कापून खून विजयनगरमधील घटना : मृतदेह दुसरीकडे फेकला
सांगली : सांगली-मिरज रस्त्यावर विजयनगर येथे ३५ ते ४० वर्षीय अनोळखी व्यक्तीचा कान कापून निर्घृण खून केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. मृतदेहाची अजूनही ओळख पटलेली नाही. विजयनगरमध्ये पर्ल हॉटेलपासून काही अंतरावर खून केला. त्यानंतर मृतदेह याच परिसरात अन्यत्र ठिकाणी फेकून दिल्याचे निष्पन्न झाले आहे.
विजयनगरमधील अथर्व बंगल्यासमोर मोकळ्या जागेत सकाळी सात वाजता मृतदेह पडल्याची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाजवळ एक मोठी काठी व रक्ताचे डाग पडले होते. त्याचा उजवा पाया काळा ठिक्कर पडलेला होता. तसेच उजवा कान कापलेला आहे.
पायावर व पिंडरीवर धारदार शस्त्राचे वार आहेत. रविवारी मध्यरात्री खून झाल्याचा संशय आहे. हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी घटनास्थळी श्वान पथकास पाचारण केले होते. श्वान मृतदेहापासून पर्ल हॉटेलच्यादिशेने पळत सुटले. हॉटेलपासून दोनशे मीटर अंतरावर जाऊन ते घुटमळले. याठिकाणीही पोलिसांना रक्ताचे डाग आढळून आले. यावरुन हा खून येथे करुन मृतदेह अथर्व बंगल्यासमोर फेकून दिल्याचा संशय आहे.