सांगलीत गव्याची एन्ट्री, मार्केट यार्डात जमावबंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 14:32 IST2021-12-28T14:32:16+5:302021-12-28T14:32:50+5:30

सांगली, कसबेडिग्रज परिसरात दिसणारा गव्याने मंगळवारी पहाटेच्या सुमारास शहरात प्रवेश केला.

curfew in sangli market yard after gava entry | सांगलीत गव्याची एन्ट्री, मार्केट यार्डात जमावबंदी

सांगलीत गव्याची एन्ट्री, मार्केट यार्डात जमावबंदी

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली: सांगली, कसबेडिग्रज परिसरात दिसणारा गव्याने मंगळवारी पहाटेच्या सुमारास शहरात प्रवेश केला. पहाटेच्या  सुमारास स्टेशन चौकात पहिल्यांदा गव्याचे दर्शन झाले. त्यानंतर सकाळी गवा वसंतदादा मार्केट यार्डात दिसून आला.

पोलिसांनी तातडीने मार्केट यार्ड परिसरात नाकाबंदी करीत जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. मार्केट यार्डाचे दोन्ही प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहेत. विश्रामबाग पोलिस ठाण्याचे निरीक्षक कल्लाप्पा पुजारी, वन विभागाचे उपवनसंरक्षक विजय पाटील, प्राणीमित्र अजित पाटील, मुस्तफा मुजावर, कौस्तूभ पोळ यांच्यासह अनेक प्राणीमित्र घटनास्थळी आले आहेत. गवा पाहण्यासाठी नागरिकांनीही मोठी गर्दी केली आहे.
 

Web Title: curfew in sangli market yard after gava entry

टॅग्स :Sangliसांगली