अंगारकी संकष्टीनिमित्त सांगलीच्या गणपती मंदिरात गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2021 19:11 IST2021-11-23T19:10:20+5:302021-11-23T19:11:30+5:30
सांगली : दीड वर्षात अनलॉक काळात प्रथमच आलेल्या अंगारकी संकष्टीमुळे सांगलीच्या गणपती मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. ...

अंगारकी संकष्टीनिमित्त सांगलीच्या गणपती मंदिरात गर्दी
सांगली : दीड वर्षात अनलॉक काळात प्रथमच आलेल्या अंगारकी संकष्टीमुळे सांगलीच्या गणपती मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. भाविकांना मागील अंगारकीला बंधने होती. यावेळी मंदिरे खुली असल्याने भाविकांनी दर्शनासाठी दिवसभर गर्दी केली होती. मंदिर प्रशासनाने मात्र कोरोनाचे निर्बंध पाळत सॅनिटायझर, सुरक्षित अंतराच्या नियमांचे पालन करण्याबाबत दक्षता घेतली होती.
अंगारकी संकष्टीमुळे श्री च्या मुर्तीला आकर्षक सजावट करण्यात आली होती. यामुळे भक्तीमय वातावरणात मंदिर परिसर उजाळून गेला होता.
कोरोना पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व मंदिरे बंद होती. कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येताच प्रशासनाने नियमात शिथीलता आणली. यानंतर सर्व व्यवहार सुरळीत सुरु होण्यास सुरुवात झाली. मात्र सरकारने मंदिरे खुली करण्यास परवानगी दिली नव्हती. या विरोधात भाजपने राज्यभरात मंदिरे उघडण्यासाठी घंटानाद आंदोलने केली. यानंतर अखेर सर्व परिस्थितीचा विचार करता प्रशासनाने मंदिरे उघडण्यास परवानगी दिली. यानंतर भाविकांना मंदिरात जावून दर्शन घेता येवू लागले.
मात्र, प्रशासनाने कडक नियमावली जाहीर केली आहे. अनेक ठिकाणी ई-पासची सुविधा लागू करण्यात आली आहे. या ई-पास शिवाय अनेक ठिकाणी मंदिरात प्रवेश दिला जात नाही. मात्र अनेक ठिकाणी ही सुविधा नसली तरी योग्य ती खबरदारी घेवून मंदिरे खुली करण्यात आली आहेत.