शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
2
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
3
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
4
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
5
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
6
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
7
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
8
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
9
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
10
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
11
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
12
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
13
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
14
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
15
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
16
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
17
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
18
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
19
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
20
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल

सुखवाडीत मगरीचा वृद्धावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 3:22 PM

सुखवाडी (ता. पलूस) येथील भीमराव दत्तू पाटील (वय ७७) या वृद्धावर कृष्णा नदीमध्ये मगरीने हल्ला केला. मगरीने त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा जोरात चावा घेतला. प्रसंगावधान राखून तातडीने पाटील पाण्याबाहेर पडल्यामुळे त्यांचा जीव वाचला. सोमवारी सकाळी सहा वाजता ही घटना घडली.

ठळक मुद्देवृद्धाच्या हाताच्या अंगठ्यास मगरीने घेतला चावा केवळ दैव बलवत्तर म्हणून जीव बचावलामगरींचा बंदोबस्त करा, ग्रामस्थांमधून मागणी

भिलवडी , दि. १७ : सुखवाडी (ता. पलूस) येथील भीमराव दत्तू पाटील (वय ७७) या वृद्धावर कृष्णा नदीमध्ये मगरीने हल्ला केला. मगरीने त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा जोरात चावा घेतला. प्रसंगावधान राखून तातडीने पाटील पाण्याबाहेर पडल्यामुळे त्यांचा जीव वाचला. सोमवारी सकाळी सहा वाजता ही घटना घडली.

भीमराव पाटील हे श्री संतोष भारती मठात सेवेकरी आहेत. नेहमीप्रमाणे पहाटे ते कृष्णा नदीकाठी पाणवठ्यावर अंघोळ करण्यासाठी गेले होते. अंघोळ करीत असताना अचानक मगरीने त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याजवळ चावा घेतला. मगरीने हात पकडल्याची जाणीव होताच प्रसंगावधान राखून क्षणार्धात ते पाण्यातून बाहेर पडले. केवळ दैव बलवत्तर म्हणून त्यांचे प्राण वाचले.

दरम्यान, ही माहिती काही वेळातच गावात समजली. भीमराव पाटील यांचे चिरंजीव कृष्णा पाटील व हरी पाटील, तसेच नातू अमृतेश यांनी तात्काळ त्यांना उपचारासाठी भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.सरपंच संदीप पाटील, पोलिसपाटील अनिकेत जगताप, तंटामुक्त ग्राम समितीचे अध्यक्ष भगवान जगताप, पाणी पुरवठा कर्मचारी प्रकाश यादव व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

मगरींचा बंदोबस्त करा...कृष्णा नदीत मगरींची संख्या वाढली असून, वरच्यावर त्यांचे पाणवठ्यावर दर्शन होते. यापूर्वीही अनेकदा मगरींच्या हल्ल्याचे प्रकार घडले आहेत. वन विभागाने त्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

टॅग्स :riverनदीPoliceपोलिस