सांगली : सांगली लोकसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर, दोघेही ‘मॉर्निंग वॉक’ वेळी महावीर उद्यानात आमने सामने आले, तेव्हा दोघांनी हस्तांदोलन केले. तेव्हा कार्यकर्त्यांनीही एकमेकांशी हसत हातात मिळविला. दोघांच्या भेटीची पाहणाऱ्यांमध्ये मात्र चर्चा रंगली.महाविकास आघाडीची उमेदवारी पदरात पाडत चंद्रहार यांनी बाजी मारली आहे, तर विशाल पाटीलही बंडखोरी करत मैदानात उतरले आहेत. खासदार संजय पाटील, विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील अशी तिहेरी लढत होत आहे. राजकीय आखाड्यात प्रचारासाठी तिघांनीही कंबर कसली आहे. तिघेही उमेदवार नुकतेच रमजान ईद, डॉ.आंबेडकर जयंतीच्या वेळी एकत्र दिसले होते.
विशाल-चंद्रहार यांची प्रचारात टीका अन् समोर हस्तांदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 15:59 IST