कुपवाडमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 14:36 IST2019-11-13T14:35:29+5:302019-11-13T14:36:53+5:30
कुपवाड शहरातील अहिल्यानगर परिसरातील संजय इंडस्ट्रीयल इस्टेट मधील एका खत गोदामाच्या समोरील पडक्या विहीरीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा कमरेला दगड बांधून खून करण्यात आला. ही खळबळजनक घटना बुधवारी सकाळी उघडकीस आला.

कुपवाडमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून
कुपवाड : शहरातील अहिल्यानगर परिसरातील संजय इंडस्ट्रीयल इस्टेट मधील एका खत गोदामाच्या समोरील पडक्या विहीरीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा कमरेला दगड बांधून खून करण्यात आला. ही खळबळजनक घटना बुधवारी सकाळी उघडकीस आला.
श्रेयस सतीश कवठेकर (वय 22,रा.आनंदनगर,सूतगिरणीजवळ,कुपवाड)असे खून झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रेयस कवठेकर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्या विरोधात चोरी व घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
अहिल्यानगर जवळील संजय इंडस्ट्रीयल मधील एका खत कंपनीच्या गोदामासमोरील एका पडक्या विहीरीत तरुणांचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची माहिती कुपवाड पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
हेल्पलाईन इमरजन्सी रेस्क्यू टीमच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. सदरचा मृतदेह हा रेकॉर्डवरील गुन्हेगार कवठेकर याचा असल्याचे निष्पन्न झाले. त्याला मारहाण करून कमरेला दगड बांधून विहीरीत फेकून दिल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले.
पोलिसांनी नातेवाईकांना पाचारण केल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पटली.
खूनाचा गुन्हा दाखल करुन रेकॉर्डवरील गुन्हेगाराची माहिती घेण्यात आली.पोलिस तपासात रेकॉर्डवरील एका गुन्हेगाराचे नाव निष्पन्न झाले असून त्या दिशेने तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, कवठेकर याचा खून कोणत्या कारणातून झाला हे अजूनही अस्पष्ट झाले नाही.