शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कर्मचाऱ्यांची गुन्हेगारी प्रकरणे निलंबन आढावा समितीसमोर ठेवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2021 14:17 IST

State transport Sangli: एसटीच्या सेवेतून निलंबित केलेले कर्मचारी व अधिकाऱ्यांवर ९० दिवसांच्या आता दोषारोपपत्र दाखल करण्याचे आदेश महाव्यवस्थापक माधव काळे यांनी जारी केले आहेत. बेकायदेशीर कृत्य केल्यानंतरही दोषारोपपत्र लवकर दाखल होत नसल्याने बिनधास्त असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे या आदेशामुळे दणाणले आहे.

ठळक मुद्देएसटी कर्मचाऱ्यांची गुन्हेगारी प्रकरणे निलंबन आढावा समितीसमोर ठेवणारबिनधास्त कर्मचाऱ्यांचे धाबे आदेशामुळे दणाणले

संतोष भिसेसांगली : एसटीच्या सेवेतून निलंबित केलेले कर्मचारी व अधिकाऱ्यांवर ९० दिवसांच्या आता दोषारोपपत्र दाखल करण्याचे आदेश महाव्यवस्थापक माधव काळे यांनी जारी केले आहेत. बेकायदेशीर कृत्य केल्यानंतरही दोषारोपपत्र लवकर दाखल होत नसल्याने बिनधास्त असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे या आदेशामुळे दणाणले आहे.एसटीच्या अनेक कर्मचारी व अधिकाऱ्यांवर वेगवेगळ्या कारणांखाली गुन्हे दाखल आहेत. यामध्ये एसटीविषयक गुन्ह्यांबरोबरच व्यक्तीगत बेकायदेशीर कृत्यांचाही समावेश आहे. बेहिशेबी मालमत्ता, चोरी, खून किंवा खुनाचा प्रयत्न, नैतिक अध:पतन, लाचलुचपत, बलात्कार, महामंडळाची फसवणूक आदी गुन्ह्यांचा समावेश आहे.

गुन्हेगारी कृत्यांमुळे कर्मचारी व अधिकाऱ्यांवर एसटीने निलंबनाची कारवाई केली आहे. निलंबन कालावधी संपल्याने परत एसटीच्या सेवेत रुजूदेखील झाले आहेत. त्यांच्यावर दोषारोपपत्र वेळेत दाखल होत नसल्याने गुन्हे वर्षानुवर्षे रखडतात. गुन्हेगारीला आळा घालण्याचा हेतू यामुळे पूर्णत: सफल होत नाही.महाव्यवस्थापकांनी याविषयी काढलेल्या आदेशात म्हंटले आहे की, पोलीस किंवा लाचलुचपत खात्याकडून अनेकदा अपेक्षित कालावधीत दोषारोपपत्र दाखल केले जात नाही. अशी प्रकरणे एसटीच्या निलंबन आढावा समितीसमोर सादर करावयाची आहेत. त्यामुळे संबंधितविभागीय नियंत्रकांनी आपल्या विभागातील अशी गुन्हेगारी प्रकरणे कमाल ७५ दिवसांपर्यंत मध्यवर्ती कार्यालयाकडे सादर करावीत.

टॅग्स :state transportएसटीSangliसांगली