सांगली : मिरजेत मयूर वाद्याची निर्मिती, सतारमेकर यांनी टाकली लौकिकात भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 15:42 IST2018-09-07T15:37:55+5:302018-09-07T15:42:01+5:30

मिरजेतील ज्येष्ठ तंतुवाद्य निर्माते अमिरहमजा सतारमेकर यांनी मोराच्या आकारातील मयूर वाद्याची निर्मिती केली आहे.

The creation of the Peerage Plant in Mirzayat, Amirhammaja Satarmker | सांगली : मिरजेत मयूर वाद्याची निर्मिती, सतारमेकर यांनी टाकली लौकिकात भर

सांगली : मिरजेत मयूर वाद्याची निर्मिती, सतारमेकर यांनी टाकली लौकिकात भर

ठळक मुद्देमिरजेत मयूर वाद्याची निर्मितीशिल्पगुरू पुरस्कारासाठी वाद्य तयार

मिरज : मिरजेतील ज्येष्ठ तंतुवाद्य निर्माते अमिरहमजा सतारमेकर यांनी मोराच्या आकारातील मयूर वाद्याची निर्मिती केली आहे.

शिल्पगुरू पुरस्कारासाठी सहा महिने परिश्रम घेऊन मयूर वाद्य तयार करण्यात आले आहे. मयूर वाद्याचे तीन भाग होतात. इलेक्ट्रॉनिक मयूर वाद्याचा आवाज मोठा व मधुर आहे.

महापौर संगीता खोत यांनी सतारमेकर यांच्या दुकानास भेट देऊन, या वाद्याची निर्मिती करून सतारमेकर यांनी मिरजेच्या लौकिकात भर टाकल्याचे सांगितले. याप्रसंगी गजेंद्र कुळ्ळोळी, मोहसीन मिरजकर, फारूक सतारमेकर उपस्थित होते.

Web Title: The creation of the Peerage Plant in Mirzayat, Amirhammaja Satarmker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.