शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

मिरज-कोल्हापूर लोहमार्ग दुहेरीकरणाच्या कामासाठी प्रतिकिमी २१ कोटी खर्च, प्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 13:03 IST

मिरज-कोल्हापूर लोहमार्ग दुहेरीकरणाचे शिवधनुष्य

सांगली : मिरज ते कोल्हापूर लोहमार्गाच्या दुहेरीकरणाचा प्रस्ताव दिल्ली दरबारी मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. या कामासाठी ९८४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सध्या पश्चिम महाराष्ट्रातील मिरज-कोल्हापूर व मिरज-कुर्डूवाडी या दोनच लोहमार्गांचे दुहेरीकरण होणे बाकी आहे.मिरज ते कोल्हापूर मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. हा मार्ग एकेरी असल्याने लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस रेल्वे सोडण्यात अडचणी येतात. हा मार्ग दुहेरी झाला तरी कोल्हापुरातील फलाटांची मर्यादित संख्या हीदेखील रेल्वेपुढे मुख्य समस्या आहे. सध्या कोल्हापूर स्थानकाच्या विस्तारीकरणाची प्रक्रिया सुरु आहे. ती पूर्ण झाल्यानंतर गाड्यांची संख्या वाढू शकेल. पण, त्यासाठी कोल्हापूर ते मिरज हा मार्ग दुहेरी होण्याची आवश्यकता आहे.

४७ किलोमीटर अंतराच्या या मार्गाच्या दुहेरीकरणाचा आराखडा रेल्वेने यापूर्वीच तयार केला आहे. त्यासाठी ९८३ कोटी ९५ लाख रुपये खर्च येणार आहे. अर्थात, एका किलोमीटरचा हा खर्च २० कोटी ९३ लाख रुपये आहे. दुहेरीकरणाला मंजुरी मिळून त्याचे काम प्रत्यक्षात सुरु होईल, तेव्हा हा खर्च प्रतिकिलोमीटर ३० कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाचा ५० टक्के खर्च महाराष्ट्र शासन उचलेल अशी अपेक्षाही रेल्वेने ठेवली आहे. दुहेरीकरणाचा हा प्रस्ताव रेल्वे मंडळाकडे ऑक्टोबर २०२२ मध्ये सादर करण्यात आला आहे. त्यावर रेल्वे मंत्रालय विचार करत असून, अद्याप हिरवा कंदील मिळालेला नाही. कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींनी यासाठी पाठपुरावा करण्याची प्रवाशांची मागणी आहे.

भूसंपादनाचा खर्च मोठामिरज ते कोल्हापूर दरम्यान लोहमार्गाच्या दोन्ही बाजूंना बागायत शेती आहे. त्यामुळे दुहेरीकरणासाठी जमिनी घेताना भूसंपादनाला मोठा खर्च करावा लागणार आहे. अनेक ठिकाणी लोहमार्गाला खेटूनच शेती आहे. अगदी मोजक्याच ठिकाणी रेल्वेची स्वत:ची जमीन शिल्लक आहे. त्याशिवाय कृष्णा व पंचगंगा नदीवरील मोठ्या पुलांसह छोट्या-मोठ्या पुलांचाही मोठा खर्च करावा लागणार आहे.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजkolhapurकोल्हापूरrailwayरेल्वेCentral Governmentकेंद्र सरकार