शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत आता चार उपायुक्त, आठ सहायक आयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:28 IST

सांगली : अपुऱ्या मनुष्यबळामुळे महापालिकेचा कारभार कोलमडलेला असतानाच, आयुक्त नितीन कापडणीस यांनी तब्बल २३ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आकृतीबंध व सेवा ...

सांगली : अपुऱ्या मनुष्यबळामुळे महापालिकेचा कारभार कोलमडलेला असतानाच, आयुक्त नितीन कापडणीस यांनी तब्बल २३ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आकृतीबंध व सेवा प्रवेश नियमावली अंतिम केली आहे. नव्या आकृतीबंधामुळे महापालिकेत अडीच हजार नव्या पदांची निर्मिती होणार आहे. शासनाच्या मान्यतेनंतर महापालिकेला चार उपायुक्त, आठ सहायक आयुक्तांसह विविध विभागाला स्वतंत्र अधिकारी मिळणार आहे.

सांगली, मिरज आणि कुपवाड या तीन शहरांची मिळून महापालिका झाली, शहराचा विस्तार वाढला, लोकसंख्या वाढली; पण त्यानुसार महापालिकेच्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांची संख्या वाढू शकली नाही. त्याचा ताण प्रशासकीय कामकाजावर पडत होता. महापालिकेच्या आस्थापनेवर सध्या २३७८ पदे मंजूर आहेत. त्यापैकी दीड हजार कर्मचाऱ्यांवरच प्रशासनाचा गाडा हाकला जात आहे. एकेका अधिकाऱ्यांकडे तीन ते चार विभागांचा पदभार सोपविण्यात आला आहे. गेल्या २३ वर्षांपासून सुधारित आकृतीबंध व सेवाप्रवेश नियमही तयार करण्यात आलेले नव्हते.

आयुक्त कापडणीस यांनी पदभार हाती घेतल्यानंतर सुधारित आकृतीबंध व सेवाप्रवेश नियमावली तयार करण्याचे आदेश दिले. दोन वर्षांत पाठपुरावाही केला. त्यामुळे आता महापालिकेत २४५५ नव्या पदांची निर्मिती होणार आहे. सध्या महापालिकेकडे दोन उपायुक्त आहेत. त्यांची संख्या आता चार होईल, तर चारऐवजी आठ सहायक आयुक्त असणार आहेत. याशिवाय वैद्यकीय अधिकारी ५, शाखा अभियंता १५, कनिष्ठ अभियंता २२, नर्स २४, लिडिंग फायरमन २१, फायरमन १४३, वरिष्ठ लिपिक ६०, तर सफाई कामगारांची ११८४ नवी पदे निर्माण होतील.

चौकट

वशिलेबाजीला चाप

महापालिकेत सध्या नोकरभरतीवर निर्बंध आहेत. त्यामुळे कंत्राटी व मानधनावरील कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यात विविध पदांवरील कर्मचाऱ्यांसाठी सेवानियम अस्तित्वात नव्हते. त्यामुळे शैक्षणिक पात्रता, वय, अनुभवाचा विचार न करता वशिलेबाजीने कर्मचारी भरती केली जात होती. आता सेवा भरती नियमावलीही तयार करण्यात आली आहे. त्यामुळे वशिलेबाजीला चाप बसणार आहे.

कोट

महापालिकेच्या स्थापनेपासून आकृतीबंध तयार करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे सध्याच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला होता. नवीन आकृतीबंधाबाबत हरकती व सूचना मागविल्या आहेत. त्यानंतर महासभेच्या मान्यतेने शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला जाईल. शहराचा वाढता विस्तार, गतिमान कारभारासाठी पदनिर्मिती महत्त्वाची होती. यामुळे कामकाजात सुसूत्रता येण्यास मदत होईल.

- नितीन कापडणीस, आयुक्त

चौकट

पदसंख्येचा तपशील

वर्ग मंजूर पदे नवनिर्मित पदे एकूण

अ २९ २० ४९

ब ३९ ३७ ७६

क ८४२ ७७८ १६२०

ड १४६८ १६२० ३०८८

एकूण २३७८ २४५५ ४८३३