शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
2
अमेरिकेचे सैन्य, इराणचे महाकाय जहाज; होर्मुझ सामुद्रधुनी सहा तास संघर्ष आणि घेतले ताब्यात; व्हिडीओ पहा
3
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
4
इंधन-गॅसचा पुरवठा लवकरच सुरळीत होणार? शनिवारी २० जहाजांनी पार केले होर्मुझ...
5
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
6
सूट-बूट घालून आला, पाहुण्यांमध्ये मिसळला अन् ५ लाख घेऊन पळाला; Video पाहून बसेल धक्का
7
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
8
Latest Marathi News LIVE Updates: खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागण्या काय?
9
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
10
‘विकसित भारत संकल्पात पालघरचा सहभाग हवाच’ राज्यपालांच्या हस्ते डहाणूत आरोग्यसेवांचे लोकार्पण
11
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
12
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
13
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
14
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
15
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
16
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
17
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
18
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
19
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
20
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या अभ्यासिकेला कार्पोरेट लूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापालिकेच्या जळमटलेल्या कार्यालयांना आता कार्पोरेट लूक दिला जात आहे. पालिकेची अभ्यासिकाही अत्याधुनिक सोयीसुविधांनी नुकतीच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : महापालिकेच्या जळमटलेल्या कार्यालयांना आता कार्पोरेट लूक दिला जात आहे. पालिकेची अभ्यासिकाही अत्याधुनिक सोयीसुविधांनी नुकतीच सज्ज करण्यात आली. सीसीटीव्ही, ऑनलाईन मार्गदर्शनासह विविध सुविधा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अडीच हजार पुस्तकांचा संचही ठेवण्यात आला आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांना पहिल्यांदाच या सुविधा उपलब्ध होत आहेत.

आयुक्त नितीन कापडणीस यांनी काळी खण, आमराई सुशोभिकरणासह अनेक प्रकल्प हाती घेतले आहेत. तत्कालीन नगरपालिकेच्या काळापासून वि. स. खांडेकर वाचनालयात अभ्यासिका होती. पण त्यात असुविधाच अधिक होत्या. आयुक्तांनी या अभ्यासिकेचे रुपडेच बदलले. या अभ्यासिकेत पिण्याच्या पाण्यासाठी कुलर लावण्यात आले आहेत. संपूर्ण परिसरावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असेल. अभ्यासिका व वाचनालयाला कॉर्पोरेट लूक देण्यात आला आहे. उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाची व्यवस्था केली आहे. त्यासाठी स्क्रीनची व्यवस्था केली आहे. वाचनालयात बायोमेट्रिक प्रवेशाची व्यवस्था आहे. खुर्च्या, टेबलही बदलली आहेत. अडीच हजार पुस्तकांचा संच अभ्यासासाठी ठेवला आहे. सध्या या अभ्यासिकेत ८० मुले-मुलींची नोंदणी आहे, तर १२० मुलांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते या अभ्यासिकेचे नुकतेच लोकार्पण झाले. कोरोनाचा काळ संपताच ही अभ्यासिका खुली होणार असल्याचे आयुक्त कापडणीस यांनी सांगितले.

चौकट

एलबीटी कार्यालयात आयुर्वेदिक रुग्णालय

स्टेशन चौकातील एलबीटी कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर अत्याधुनिक असे आयुर्वेदीक रुग्णालय उभारण्यात येणार आहे. केरळमधील आयुर्वेदीक उपचार पध्दतीप्रमाणे पंचकर्मसह अन्य उपचारही होतील. खालच्या मजल्यावर विवाह नोंदणीचे कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. विवाह नोंदणीसाठी स्वतंत्र सॉफ्टवेअर तयार करण्यात येत आहे. घरातून विवाह नोंदणीसाठी लागणारी सर्व कागदपत्रे अपलोड करू शकतील. केवळ प्रमाणपत्रासाठी नागरिक या कार्यालयात येतील, अशी व्यवस्था केल्याचे कापडणीस यांनी सांगितले.