शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

CoronaVirus Lockdown : शेजारील जिल्ह्यात काम करणाऱ्या कामगारांना ये-जा करण्यास पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2020 11:38 AM

राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून राज्य शासनाकडून विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यत येत आहेत. लॉकडाऊनचा कालावधी ३० जून २०२० पर्यंत वाढविण्यात आला आहे. परंतु लॉकडाऊन वाढवीत असताना शासनाने राज्याची आर्थिक बाजू सक्षम होण्याच्या दृष्टीने उद्योग घटकांना परवानगी दिली आहे. 

ठळक मुद्देशेजारील जिल्ह्यात काम करणाऱ्या कामगारांना ये-जा करण्यास पास देण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्राधिकृत

सांगली : राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून राज्य शासनाकडून विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यत येत आहेत. लॉकडाऊनचा कालावधी ३० जून २०२० पर्यंत वाढविण्यात आला आहे. परंतु लॉकडाऊन वाढवीत असताना शासनाने राज्याची आर्थिक बाजू सक्षम होण्याच्या दृष्टीने उद्योग घटकांना परवानगी दिली आहे. 

सांगली जिल्ह्यात रहिवासी असलेले कामगार जे सांगली जिल्हा हद्दीला लागून असणाऱ्या जिल्ह्यातील उद्योग घटकांमध्ये कामास आहेत अशा कामगारांना सदर उद्योग घटकांमध्ये ये-जा करण्यासाठी दैनंदिन पास देणे आवश्यक आहे.

त्या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक नितीन कोळेकर यांना जिल्ह्यात रहिवासी असलेले कामगार, जे सांगली जिल्हा स्थलसीमा हद्दीला लागून असणाऱ्या जिल्ह्यातील उद्योग घटकांमध्ये कामास आहेत, अशा कामगारांना सदर उद्योग घटकांमध्ये ये-जा करण्यास दैनंदिन पास देण्यासाठी प्राधिकृत केले आहे.बाहेर जाणाऱ्यांची संख्या १ लाख ४० हजाराहून अधिक तर येणाऱ्यांची संख्या ५५ हजाराहून अधिककोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशभर लॉकडाऊन जारी आहे. लॉकडाऊनमुळे सांगली जिल्ह्यातील अनेक व्यक्ती राज्याबाहेर व राज्यातील अन्य जिल्ह्यात अडकून पडल्या आहेत. तसेच सांगली जिल्ह्यातही अन्य जिल्ह्यातील व राज्याबाहेरील व्यक्ती अडकून पडल्या आहेत. या व्यक्तींना त्यांच्या स्वगृही जाता यावे यासाठी शासनाच्या वतीने अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत.

दिनांक ४ जून पर्यंत सांगली जिल्ह्यातून राज्याबाहेर व अन्य जिल्ह्यात जाणाऱ्यांची संख्या १ लाख ४० हजार ६९१ इतकी असून सांगली जिल्ह्यात राज्याबाहेरून व राज्यातील अन्य जिल्ह्यातून येणाऱ्यांची संख्या ५५ हजार ९०६ इतकी आहे. अशा येणाऱ्या व जाणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या १ लाख ९६ हजार ५९६ इतकी आहे. अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी दिली.यामध्ये सांगली जिल्ह्यातून राज्याबाहेर जाणाऱ्या३७ हजार ४९२ व्यक्ती आहेत तर राज्यातील अन्य जिल्ह्यात जाणाऱ्या १लाख ३ हजार १९९ व्यक्ती आहेत. सांगली जिल्ह्यात राज्याबाहेरून येणाऱ्या १२ हजार ४४४ व्यक्ती आहेत तर राज्यातील अन्य जिल्ह्यातून येणाऱ्या ४३ हजार ४६२ व्यक्तींचा समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली