CoronaVirus Lockdown : सांगली व मिरज शहरातील रेडलाईट भागात धान्य किटचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 13:10 IST2020-05-19T13:09:16+5:302020-05-19T13:10:43+5:30
कोवीड-19 च्या काळात देहविक्रय करणाऱ्या महिलांना कोरोनाची बाधा होवू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने काळजी घेतली आहे. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार व त्यांच्या टीमने सदरच्या भागात जावून या आजारापासून बचाव करण्याकरीता या व्यवसायापासून दूर राहावे, असे समुपदेशन व भावनीक आवाहन केले.

CoronaVirus Lockdown : सांगली व मिरज शहरातील रेडलाईट भागात धान्य किटचे वाटप
सांगली : कोवीड-19 च्या काळात देहविक्रय करणाऱ्या महिलांना कोरोनाची बाधा होवू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने काळजी घेतली आहे. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार व त्यांच्या टीमने सदरच्या भागात जावून या आजारापासून बचाव करण्याकरीता या व्यवसायापासून दूर राहावे, असे समुपदेशन व भावनीक आवाहन केले.
सदर महिलांच्या दैनंदिन उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटावा म्हणून त्यांना जिल्हा प्रशासनामार्फत 400 किटचे आवश्यक धान्य किट वाटप करण्यात आले.
त्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी पुढाकार घेतल्याबाबत संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत आहे. यासाठी तहसिलदार रणजीत देसाई, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी शिल्पा ओसवाल यांचेही सहकार्य लाभले.