CoronaVirus Lockdown : जिल्ह्यात ३५ हजार जणांचे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 06:46 PM2020-05-22T18:46:13+5:302020-05-22T18:49:59+5:30

बुधवारपर्यंत जिल्ह्यातून अन्य जिल्ह्यात व राज्यात ७५ हजार २२३ व्यक्ती गेल्या असून राज्याबाहेरून व राज्यातील अन्य जिल्ह्यातून ३५ हजार ५७१ व्यक्ती जिल्ह्यात आल्या आहेत, अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी दिली.

CoronaVirus Lockdown: 35,000 people arrive in the district | CoronaVirus Lockdown : जिल्ह्यात ३५ हजार जणांचे आगमन

CoronaVirus Lockdown : जिल्ह्यात ३५ हजार जणांचे आगमन

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात ३५ हजार जणांचे आगमनजिल्ह्यातून ७५ हजार जण बाहेर

सांगली : लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकून पडलेल्या व्यक्तींना त्यांच्या गावी जाण्यासाठी व परजिल्ह्यात,परराज्यात अडकून पडलेल्यांना जिल्ह्यात येण्यासाठी प्रशासनाने परवानगी देण्यास सुरूवात केली आहे.

बुधवारपर्यंत जिल्ह्यातून अन्य जिल्ह्यात व राज्यात ७५ हजार २२३ व्यक्ती गेल्या असून राज्याबाहेरून व राज्यातील अन्य जिल्ह्यातून ३५ हजार ५७१ व्यक्ती जिल्ह्यात आल्या आहेत, अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी दिली.

लॉकडाऊनच्या शिथीलतेनंतर वाहतूकीस व प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार प्रशासनाकडे रितसर परवानगी मिळवून जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी व जिल्ह्यात येण्यासाठी प्रक्रीया राबविण्यात येत आहे.

यामध्ये सांगली जिल्ह्यातून राज्याबाहेर जाणाऱ्या २९ हजार ६५० व्यक्ती आहेत तर राज्यातील अन्य जिल्ह्यात जाणाऱ्या ४५ हजार ५७३ व्यक्तींचा समावेश आहेत. सांगली जिल्ह्यात राज्याबाहेरून आलेल्या ८ हजार ६९२ तर राज्यातील अन्य जिल्ह्यातून आलेल्या २६ हजार ८६९ व्यक्तींचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: CoronaVirus Lockdown: 35,000 people arrive in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.