CoronaVirus :सांगली जिल्ह्यात चार नवे रुग्ण, सहा जणांची प्रकृती चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 17:47 IST2020-06-09T17:46:02+5:302020-06-09T17:47:17+5:30

जिल्ह्यात आज नव्याने चार कोरोना रुग्ण आढळून आले. किनरेवाडी (ता. शिराळा), विहापूर (ता. कडेगाव) येथील प्रत्येकी एक, तर निंबवडे (ता. आटपाडी) येथील दोघांचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या १८२ झाली आहे.

CoronaVirus: Four new patients in Sangli district | CoronaVirus :सांगली जिल्ह्यात चार नवे रुग्ण, सहा जणांची प्रकृती चिंताजनक

CoronaVirus :सांगली जिल्ह्यात चार नवे रुग्ण, सहा जणांची प्रकृती चिंताजनक

ठळक मुद्देसांगली जिल्ह्यात चार नवे रुग्ण, सहा जणांची प्रकृती चिंताजनकआष्टा येथील एकजण कोरोना मुक्त रुग्णांची संख्या १८२

सांगली : जिल्ह्यात आज नव्याने चार कोरोना रुग्ण आढळून आले. किनरेवाडी (ता. शिराळा), विहापूर (ता. कडेगाव) येथील प्रत्येकी एक, तर निंबवडे (ता. आटपाडी) येथील दोघांचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या १८२ झाली आहे.

शिराळा तालुक्यातील किनरे वाडी येथील ३५ वर्षीय पुरुषाचा अहवाल मंगळवारी पॉझिटिव आला तो काही दिवसांपूर्वी मुंबईतून गावी आला होता. विहापुर येथील ८२ वर्षीय वृद्ध व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. मुलगा, सून व दोन नातवासह ही वृद्ध व्यक्ती २ जून रोजी मुंबईहून विहापुरला आले होते.

3 जून रोजी त्यांना त्रास जाणवू लागल्याने मिरजेच्या कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यांचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला. तर निंबवडे येथील ५८ वर्षीय पुरुष व ६५ वर्षीय महिलेला कोरोना झाला आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 182 झाले असून त्यापैकी शंभर रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.

मंगळवारी आष्टा झोळंबी वसाहतीतील एक रुग्ण कोरोनामुक्त झाला. तर सहा रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी सांगितले

Web Title: CoronaVirus: Four new patients in Sangli district