CoronaVirus : सांगलीत १६ नवे कोरोनाचे रुग्ण, एकूण संख्या १६७

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 13:19 IST2020-06-08T13:18:08+5:302020-06-08T13:19:50+5:30

सांगलीत १६ नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १६७ झाली आहे. रविवारी कोरोनाने दोंघांचे बळी घेतले. एकूण ७ जणांचे मृत्यू झाले आहेत. आतापर्यंत ९२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर ६८ रुग्णांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

CoronaVirus: 16 new corona patients in Sangli, total number 167 | CoronaVirus : सांगलीत १६ नवे कोरोनाचे रुग्ण, एकूण संख्या १६७

CoronaVirus : सांगलीत १६ नवे कोरोनाचे रुग्ण, एकूण संख्या १६७

ठळक मुद्देसांगली जिल्ह्यात कोरोनाचे दोन बळी आवंढी, मणदुर येथील कोरोना बाधितांचा मृत्यू नवीन १६ रुग्ण, पाचजण कोरोनामुक्त

सांगली : सांगलीत १६ नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १६७ झाली आहे. रविवारी कोरोनाने दोंघांचे बळी घेतले. एकूण ७ जणांचे मृत्यू झाले आहेत. आतापर्यंत ९२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर ६८ रुग्णांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रकोप वाढताना दिसत असून रविवारी एकाच दिवसात दोन बाधित रुग्णांचा मृत्यू झाला तर एकाच दिवसात तब्बल सोळा नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. मणदूर ता शिराळा व आवंढी ता. जत येथील दोघांचा मृत्यू झाला आहे .

रविवारी जिल्ह्यात एकाच दिवसात १६ नवीन रुग्ण आढळून आले आहेत यात मणदुर येथील बारा जणांचा समावेश आहे. तर सोनवडे, पेड, विटा, वायफळे येथील रुग्णांचा समावेश आहे.

कोरोनामुळे जिह्यात आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या १६७ झाली असून ९२ जण बरे झाले आहेत तर पाच जण कोरोना मुक्त झाले आहेत.

Web Title: CoronaVirus: 16 new corona patients in Sangli, total number 167