corona virus : दूधगाव येथे कोरोनाबाधिताची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 15:17 IST2020-09-07T15:16:26+5:302020-09-07T15:17:32+5:30
मिरज तालुक्यातील दुधगाव येथे कुटुंबातील पाचजणांना कोरोनाचे निदान झाल्याच्या चिंतेतून ५६ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर काहीच वेळाने मिरज येथील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या या व्यक्तीच्या मुलाचाही मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सांगली ग्रामीण पोलिसात या घटनेची नोंद आहे.

corona virus : दूधगाव येथे कोरोनाबाधिताची आत्महत्या
सांगली : मिरज तालुक्यातील दुधगाव येथे कुटुंबातील पाचजणांना कोरोनाचे निदान झाल्याच्या चिंतेतून ५६ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर काहीच वेळाने मिरज येथील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या या व्यक्तीच्या मुलाचाही मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सांगली ग्रामीण पोलिसात या घटनेची नोंद आहे.
मिरज तालुक्यातील दुधगाव येथील एकाच कुटुंबातील पाचजणांना कारोनाचे निदान झाले होते. पत्नी, दोन मुले, सून व स्वत:लाही कोरोनाची बाधा झाल्याने ही व्यक्ती चिंतेत होती. त्यांच्या एका मुलाला मिरजेतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याची प्रकृती चिंताजनक बनल्याने ते चिंतेत होते.
संपूर्ण कुटुंबच कोरोनाग्रस्त झाल्याने व आर्थिक भार पेलणार नाही, या विवंचनेतून त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सांगली ग्रामीण पोलिसात या घटनेची नोंद आहे.
दुधगाव येथील या व्यक्तीने चिंतेतून आत्महत्या केली. या घटनेस काही तास होत नाहीत तोवरच त्यांच्या मुलाचाही मिरजेतील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे केवळ २४ तासात एकाच कुटुंबातील दोघेजण कोरोनाने गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.