corona virus : कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांना कोरोना, पुणे येथील घरी उपचार सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 14:42 IST2020-09-11T14:39:54+5:302020-09-11T14:42:54+5:30
कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांना कोरोना झाला आहे. ताप व अंगदुखी असल्याने काल कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आला. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याना पुणे येथील घरीच विलगीकरण करण्यात आले आहे.

corona virus : कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांना कोरोना, पुणे येथील घरी उपचार सुरु
ठळक मुद्देकृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांना कोरोनापुणे येथील घरी उपचार सुरु
सांगली : कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांना कोरोना झाला आहे. ताप व अंगदुखी असल्याने काल कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आला. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याना पुणे येथील घरीच विलगीकरण करण्यात आले आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया चाचणी करून घ्यावी. माझ्या तब्येतीला धोका नाही. वैद्यकीय तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घरीच विलगीकरणात मी उपचार घेत आहे. माझे कार्यालय नियमित सुरू असून मीदेखील फोन द्वारे उपलब्ध राहण्याचा प्रयत्न करीन, असे कदम यांनी सांगितले.